25 एप्रिल : 'भारतात वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी' असं चित्र दिसत असल्याचं भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली.
'बदल होणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व बाळगाल तर उद्ध्वस्त व्हाल', असा सूचक इशाराही त्यांनी आपल्याच नेत्यांना दिला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात ते बोलत होते.
भाजपने आधीच नोटबंदी करून लोकांना कडुनिंबाची चव चाखायला लावली आता तर त्यावर कारले चढवून जीएसटीसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीची भेट दिली, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना भाजपविरोधातच किती नाराजी हे दिसून येतं.
ते पुढे म्हणाले की, 'लोक पंतप्रधानांना भेटू शकत नसले तरी आम्हाला मात्र निवडणुकीची आश्वासने कुठे गेली असा प्रश्न विचारत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले, इथे हमीभाव मिळत नाही तर अधिक दर मिळणं तर लांब आहेत' असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, बलात्कारांच्या वाढत्या घटनांवरून भाजप कार्यकर्त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली, त्यात आता शत्रुघ्न सिन्हा यांनीही आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मोदींनी कितीही दम भरला तरी कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असंच दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Narendra modi, Shatrughan sinha