जम्मू-कश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद, महिलेचाही मृत्यू

जम्मू-कश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद, महिलेचाही मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेच्या (International Border) बाजूने पुढील भागात पाकिस्तानी रेंजर्सनी रात्रभर गोळीबार केला. यामध्ये एक जवान आणि एका नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याचा निषेर्धात म्हणून या भागातील लोकांनी बुधवारी आंदोलन केलं.

  • Share this:

जम्मू-कश्मीर, 25 डिसेंबर : भारतीय लष्कराच्या (Indian Army) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir पाक सैन्याने (Pakistan Army) पुन्हा एकदा नियंत्रण रेषेकडे (LoC) उरी सेक्टरमधील शस्त्रसंधीचे उल्लंघन (Ceasefire Violation)केले आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेच्या (International Border) बाजूने पुढील भागात पाकिस्तानी रेंजर्सनी रात्रभर गोळीबार केला. यामध्ये एक जवान आणि एका नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याचा निषेर्धात म्हणून या भागातील लोकांनी बुधवारी आंदोलन केलं.

अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानकडून हिरानगर सेक्टरच्या चंदवा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या बाजूने गोळीबार करत बॉम्ब हल्लाही (Shootout) केला. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याला जवानांनी चोख उत्तर दिलं आहे. दोन्ही बाजून रात्रभर गोळीबार करण्यात आला आहे.

गोळीबाराविरोधात लोकांनी केलं प्रदर्शन

दरम्यान, कठुआ गावातील नागरिकांनी गोळीबार केल्याच्या निषेधार्थ हिरानगरमधील चन्नतंदा परिसरातील लोक बुधवारी रस्त्यावर उतरले होते. या लोकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली आणि पाकिस्तानला योग्य उत्तर दिले जावे अशी मागणी केली.

इतर बातम्या - सात जन्माचं नातं 16 दिवसांत संपलं, बॉम्बब्लास्टमध्ये जवान झाला शहीद

गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानी रेंजर्स विशेषत: मनयारी, पंसार आणि राठवा गावं लक्ष्य करीत आहेत, त्यामुळे घरे आणि इतर इमारतींचे नुकसान झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सीमेवरुन पाकिस्तानने जारी केलेल्या दहशतवाद आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारताने पाकिस्तानशी दीर्घकाळ द्विपक्षीय चर्चा रद्द केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या