राजस्थान : पोलिसांनी संशयित पाक गुप्तहेरच्या आवळल्या मुसक्या, चौकशी सुरू

राजस्थान : पोलिसांनी संशयित पाक गुप्तहेरच्या आवळल्या मुसक्या, चौकशी सुरू

जैसलमेर सीमेवर ताब्यात घेण्यात आलेल्या त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात व्हिडीओ कॉलही केला होता.

  • Share this:

जैसलमेर, 10 मार्च : राजस्थानातील जैसलमेर येथे एकाला लष्करी तळाच्या परिसरात फिरताना अटक करण्यात आली आहे. त्याने जैसलमेर येथून पाकिस्तानात व्हिडीओ कॉल केल्याचे तपासात समोर आले आहे. पाकिस्तानचा हेर असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेर येथील भारत-पाक सीमेवर पठाण खान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षादलाने त्याला रामगढ पोलिसांकडे ताबा सोपवला आहे. फतान खानकडन एक पेनड्राइव्ह, मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. पठाण सियालो की धानी येथील रहिवाशी असल्याचं समजल आहे. त्याला पकडण्यापूर्वी मोबाइलवरून पाकिस्तानात व्हीडिओ कॉल केल्याचे चौकशीत समोर आलं. त्याबाबत कसून चौकशी केली असता नातेवाईकांना कॉल केल्याचे त्याने सांगितले.

जैसलमेर येथील सियालो की धानी येथे राहणाऱ्या पठाणने 23 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याचं समोर आलं होतं. पठाण शेळीपालनाचा व्यवसाय करत असून उमरकोट येथे नातेवाईक राहतात. त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये जात असल्याचेही त्याने सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पठाणची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, काश्मीरमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पाकची आगळीक सुरूच आहे.पाकिस्तानकडून कृष्णा घाटीमध्ये पूंछ सेक्टरमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय लष्करानेही उत्तर दिले.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर आत्मघाती हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशिक्षण तळावर भारताच्या हवाई दलाने हल्ला केला होता. यानंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

First published: March 10, 2019, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading