मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानी नौदलाकडून भारतीय बोटीवर गोळीबार, एका मासेमाराचा मृत्यू

पाकिस्तानी नौदलाकडून भारतीय बोटीवर गोळीबार, एका मासेमाराचा मृत्यू

पाकिस्तानच्या नौदलाकडून (One fisherman dies in firing by Pakistan navy) करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय मासेमाराचा हकनाक बळी गेला आहे.

पाकिस्तानच्या नौदलाकडून (One fisherman dies in firing by Pakistan navy) करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय मासेमाराचा हकनाक बळी गेला आहे.

पाकिस्तानच्या नौदलाकडून (One fisherman dies in firing by Pakistan navy) करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय मासेमाराचा हकनाक बळी गेला आहे.

  • Published by:  desk news

अहमदाबाद, 7 नोव्हेंबर: पाकिस्तानच्या नौदलाकडून (One fisherman dies in firing by Pakistan navy) करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय मासेमाराचा हकनाक बळी गेला आहे. पाकिस्तानकडून रविवारी जलपरी नावाच्या भारतीय बोटीवर (Firing on Jalpari boat) गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी (Fisherman dies in firing) लागून मासेमाराचा मृत्यू झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सागरी सीमेबाबत असलेल्या संभ्रमाचा फटका मासेमारांना बसत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

काय आहे प्रकरण?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समुद्री सीमेबाबत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या बोटींना भारताची हद्द कुठे संपते आणि पाकिस्तानची कुठे सुरू होते, याची नेमकी कल्पना येत नाही. आपल्या देशाच्या हद्दीत घुसखोरी झाल्याचा दावा करत पाकिस्तानकडून भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आला. यात श्रीहरी नावाचा मासेमार ठार झाला आहे.

मासेमारांची अटक सुरूच

याच वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानननं त्यांच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली 11 भारतीय मासेमारांना अटक केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातददेखील 17 मासेमारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या नौकादेखील पाकिस्तानी नौदलानं जप्त केल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानमधील असणारी अरबी समुद्रातील सीमा निश्चित नसल्यामुळे दोन्ही देशातील मासेमारांना अटक होत असते. भारताकडूनदेखील घुसखोरी करण्यात आलेल्या पाकिस्तानी नौकाचालकांवर कारवाई करण्यात येत असते.

श्रीलंकेनंही केली होती अटक

गेल्या महिन्यांत श्रीलंकेनं 23 मासेमारांना अटक केली होती. आपल्या हद्दीत बेकायदेशीररित्या घुसखोरी केल्याचा आरोप ठेवत त्यांच्या नौकादेखील जप्त करण्यात आल्या होत्या. तर त्यापूर्वी मार्च महिन्यातही श्रीलंकेनं 54 भारतीय नागरिकांना अटक केली होती.

हे वाचा-  Big Breaking : 'या' पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला, जगात प्रथमच घडलं असं

सीमा निश्चित नसल्याचा फटका

मासेमारी करताना अनेकदा मासेमारी नौका या देशाची सीमा ओलांडून इतर देशांच्या हद्दीत घुसखोरी करतात. अनेकदा नवख्या मासेमारांना नेमकी सीमारेषा माहित नसते. त्यामुळे एकदा दुसऱ्या देशाकडून अटक झाल्यानंतर सुटका होईपर्यंत मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. या प्रक्रियेत अनेक महिन्यांचा कालावधी जातो. अनेकदा तर काही वर्षं हे मासेमारी परक्या देशात अडकून पडतात.

First published:

Tags: Death, Gujrat, India vs Pakistan