Elec-widget

अंधश्रद्धेचा बळी! गोटमार यात्रेत एकाचा मृत्यू तर तब्बल 226 जण जखमी

अंधश्रद्धेचा बळी! गोटमार यात्रेत एकाचा मृत्यू तर तब्बल 226 जण जखमी

तीनशे वर्षांची ही कुप्रथा बंद करण्यात अपयश येत असल्याने अंधश्रद्धेमुळे यंदाही बळी गेला.

  • Share this:

मध्य प्रदेश, 11 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा आणि सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी या २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर २२६ जण या प्रकारामुळे जखमी झाले. तीनशे वर्षांची ही कुप्रथा बंद करण्यात अपयश येत असल्याने अंधश्रद्धेमुळे यंदाही बळी गेला.

या यात्रेत ७१ वर्षांत १२ जण मृत्युमुखी पडले असून हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे. या प्रथेमागे एक घटना आहे. काही दिवसांपूर्वी सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडकणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेचा अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावांतील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून त्यांच्यावर दोन्हीकडून दगडांचा वर्षाव केला होता त्यात दोघे दगावले.

चंडिकामातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून प्रेमीयुगुलाला समाधी देण्यात आली. या दिवशी दोन्ही गावांतील लोक या नदीत गोटमार यात्रा भरवत असल्याची आख्यायिका आहे. दोन्ही आख्यायिका येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. या यात्रेत २२६ जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही कुप्रथा बंद करण्यात अपयश

मध्य प्रदेश प्रशासनाने ही यात्रा बंद करण्याकरता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या वर्षीसुद्धा पोळ्याच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यानंतर यात्रा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकच दगडांचा वर्षाव सुरू झाला. दगड वर्मावर लागल्याने शंकर भलावीचा बळी गेला. यात २२६ जण जखमी झाले. या जखमी होण्यालादेखील ते श्रद्धेचं प्रतीक मानतात. या सगळ्यात जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...