अमेरिका : कॅलिफोर्नियामध्ये अंदाधुंद गोळीबार, एका महिलेचा मृत्यू;3 जखमी

अमेरिका : कॅलिफोर्नियामध्ये अंदाधुंद गोळीबार, एका महिलेचा मृत्यू;3 जखमी

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळ अज्ञातानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 एप्रिल : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळ अज्ञातानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. 19वर्षांच्या हल्लेखोरानं हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

सॅन डियागोतील एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जॉन अर्नेस्ट असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. काही राउंड फायरिंग झाल्यानंतर हल्लेखोराच्या बंदुकीत बिघाड झाला. गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, हल्लेखोर जॉनची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे. पण त्यानं या हल्ल्याबाबत सोशल मीडियावर काही पोस्ट केलं होतं का?, याबाबत चौकशी केली जात आहे.

वाचा अन्य बातम्या

PM पदासाठी पवारांची राहुल गांधींना चौथ्या क्रमांकाची पसंती, पहिले 3 कोण?


भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपला मोठा दिलासा

'समीर भुजबळांना विजयी करा', शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावाने मेसेज आल्याने खळबळ

VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2019 09:33 AM IST

ताज्या बातम्या