मुंबईला येणाऱ्या विमानातून प्रवासी ताब्यात, फोनवर करत होता विमान उडवण्याच्या गोष्टी

मुंबईला येणाऱ्या विमानातून प्रवासी ताब्यात, फोनवर करत होता विमान उडवण्याच्या गोष्टी

सोमवारी सकाळी जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 26 नोव्हेंबर : सोमवारी सकाळी जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर प्रवाशांसह हा तरुण कोलकत्त्यावरून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजमध्ये प्रवास करत होता. विमानाने उड्डान घेण्याआधीच या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं.

या तरुणाने चेहऱ्यावर काळा कपडा बांधला होता आणि विमानात स्फोट घडवून आणण्याबाबत तो कोणाशीतरी फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्या ताब्यात घेतलं. त्यावेळी सुदैवाने विमानाने उड्डाण केलेलं नव्हतं, नाहीतर यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.

हेही वाचा: महाराष्ट्रात गुंडाराज..! आरोपीने पोलिसाला दांडक्याने हल्ला करून केलं ठार

9W0472 हे जेट तो उडवून टाकण्यासंदर्भात या आरोपी कोणशीतरी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. ज्या नंबरवर तो बोलत होता त्याची तपासणी आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळी 8:15च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, यानंतर विमानात काही संशयास्पद वस्तू आहे का पाहण्यासाठी संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली.

कधी कॉमेडी तर कधी सिंघम, एकाच VIDEOमध्ये पाहा या दोन्ही स्टाईल

First published: November 26, 2018, 11:14 AM IST

ताज्या बातम्या