S M L

मोदींना पुन्हा एकदा जिंकून द्या, अमित शहांनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे

News18 Lokmat | Updated On: Jan 11, 2019 04:46 PM IST

मोदींना पुन्हा एकदा जिंकून द्या, अमित शहांनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

नवी दिल्ली, 11 जानेवारी : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. '2019 च्या निवडणुका भारताच्या विकासाच्या मुद्द्यावर आहेत. पराक्रमाची पराकाष्ठा करत मोदींना पुन्हा एकदा जिंकून द्या', असं आवाहनच शहा यांनी केलं आहे. तसंच 'काश्मिरपासून ते केरळपर्यंत पूर्णपणे भाजपचं सरकार येईल', असा दावाही त्यांनी केली.

नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत 'अब की बार फिर मोदी सरकार' असा नारा देण्यात आला आहे. यावेळी भाषणात अमित शहा यांनी काँग्रेस, महाआघाडीवर टीका केली.

अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे


- देशातील 12 कोटी घरांमध्ये टॉयलेट नव्हते. त्यातल्या 9 कोटी घरांमध्ये पाच वर्षं व्हायच्या आधी टॉयलेट्स बांधले

- 2014 साली चार कोटी लोक अर्थतंत्राशी जोडले नव्हते मात्र दोन वर्षांच्या काळात 6 कोटी लोकांचे बँक अकाऊंट्स उघडले गेले

- एकेकाळी काँग्रेस विरूद्ध संगळे असं होतं आता भाजप विरूद्ध सगळे आहे

Loading...

- ज्याप्रकारे उत्तरप्रदेशात 325 जागा जिंकत भाजपनं प्रचंड यश मिळवलं.. आता तिथे आत्या-भाचा एकत्र येतायत. जे कधी एकमेकांना पाण्यात पाहात होते, ते आता हात मिळवत आहे. कारण, त्यांना माहिती आहे की, मोदींना एकट्यानं हरवणं शक्य नाही

- संपूर्ण जगात मोदींसारखा लोकप्रिय नेता नाहीये जो लोकांना धरून ठेवेल.. युती म्हणजे काय असतं.. युती म्हणजे केवळ त्या त्या राज्यातील पक्षाचं कडबोळं असतं

- 2014 मध्ये केवळ 6 राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं. 2019 च्या निवडणुकांच्या वेळी देशात 16 राज्यांत भाजपचं सरकार आहे

- 2019 च्या निवडणुका या दोन विचारसरणींच्या निवडणुका असतील

- एकीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे 35 पक्ष आणि दुसऱीकडे असा पक्ष आहे ज्यांच्याकडे ना नेता आहे, ना नेतृत्त्व आहे

- आम्हाला खात्री आहे की 2019 च्या निवडणुका आम्ही बहुमतानं जिंकू

- स्टार्ट अप कऱणाऱ्या तरूणासाठी, घरात पहिल्यांदा सिलेंडर लावलेल्या म्हातारीसाठी, घरात पहिल्यांदा टॉयलेट बनलेल्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे

- आज आपण त्यात रामलीला मैदानावर 2019 सालच्या निवडणुकींच्या तयारीसाठी जमलो आहोत. या निवडणुका भाजपसाठी आणि संपूर्ण देशासाठी खूप महत्वाच्या आहेत

- अटलजी आमच्यात नाही याची मोठी पोकळी आहे. मात्र, त्यांच्या विचारधारेचा प्रवाह कायम सुरू राहील

- भारताच्या 1700 वर्षांच्या इतिहासात एक काळ असा होता की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्ययुद्ध झालं त्यानंतर पानीपतचं युद्ध झालं. 130 युद्ध जिंकणारी मराठा सेना हे एक निर्णायक युद्ध हरली आणि त्यानंतर भारत 200 वर्षांच्या गुलामीत गेला

- सुरूवातीच्या काळात आमचं काम केवळ 6-7 राज्यांपर्यंतच मर्यादित होतं. मात्र, 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं आणि 30 वर्षांनंतर पहिल्यांदा देशाला बहुमताचं सरकार मिळालं


=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2019 04:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close