पुन्हा एकदा रात्री 8 वाजता मोदींनी भारतीयांना दिला धक्का, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पुन्हा एकदा रात्री 8 वाजता मोदींनी भारतीयांना दिला धक्का, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरात पुढील 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज भाषणात 21 दिवस देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढू नये यासाठी हे लॉकडाऊन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही मोदींनी जनता कर्फ्यूचं (Janata Curfew) आवाहन केलं होतं. त्यानंतर आज सायंकाळी 8 वाजता मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

- तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका.

- पुढील 21 दिवस देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे

- लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

- ज्या देशांनी योग्य उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.

- 22 मार्चला देशवासियांनी  जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं.

- जगातील शक्तिशाली देशांनाही कोरोनाने गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे.

- कोरोनाशी (Covid - 19) लढायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही.

- तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते.

-असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही.

- केंद्र सरकारने 15000 कोटी रुपये कोरोना व्हायरसच्या संकटासाठी दिले आहेत. मेडिकल आणि पॅरामेडिकल ट्रेनिंगच काम करावं लागेल.

- केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर गरीबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सगळे प्रयत्न आपण करीत आहोत. पण आयुष्य वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवी.

- तुमच्या आरोग्याची काळजी घेत, स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, मेडिकल सेवा देणारे कर्मचारी, मीडिया, पोलीस यांचा विचार करा.

First published: March 24, 2020, 8:57 PM IST

ताज्या बातम्या