पुन्हा एकदा बदलणार PM मोदींच्या घरचा पत्ता!

पुन्हा एकदा बदलणार PM मोदींच्या घरचा पत्ता!

राजधानी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाचा पत्ता बदलण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: राजधानी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाचा पत्ता बदलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एका आर्किटेक्ट फर्म ने पंतप्रधानांचे निवासस्थान बदलण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीला मध्य दिल्लीचे डिझाईन करण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्यानुसार हा सल्ला त्यांनी दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित आर्किटेक्ट फर्म ने पंतप्रधानांचे निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथून रायसीना हिल्स अर्थात राष्ट्रपती भवनाच्या दक्षिणेकडील डलहौजी रोडवरील हटमेंट्स येथे शिफ्ट करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय पंतप्रधानांचे कार्यालय देखील बदलण्याचा सल्ली देण्यात आल्याचे म्हटले आहे. अर्थात यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. यासाठी अनेक पक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याआधी एकदा पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता बदलण्यात आला होता. आता लोक कल्याण मार्ग असलेला मार्ग एकेकाळी रेस कोर्स रोड या नावाने ओळखला जात असे.

संबंधित वृत्तानुसार ज्या कंपनीला हे काम दिले आहे ती अहमदाबाद येथील आहे. या कंपनीने मध्य दिल्लीच्या बदलासंदर्भात काही पर्यात आणि सल्ले दिले आहेत. कंपनीने संसद भवन आणि केंद्रीय सचिवालय यांचे ठिकाण बदलण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत असलेल्या राजपथची देखील नव्याने रचना करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे संसद भवनाची नवी इमारत होय. यासाठी सरकार, लोकसभा अध्यक्ष, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि लोकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

या सर्व गोष्टींच्या निर्मितीसाठी तब्बल 10 हजार कोटी रुपये इतका खर्च होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मार्च 2024 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. याचाच अर्थ पुढील लोकसभा निवडणुका होण्याच्या दोन महिने आधी हे काम पूर्ण करावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pm modi
First Published: Nov 3, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या