दोघींनाही आवडायचा एकच मुलगा, Valentine's Day लाच दुसरीला संपवण्यासाठी केला चाकूहल्ला!

दोघींनाही आवडायचा एकच मुलगा, Valentine's Day लाच दुसरीला संपवण्यासाठी केला चाकूहल्ला!

व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रेमासाठी दोन तरुणी एकमेकींना भिडल्या. या वादात चक्क एकीने दुसऱ्या तरुणीवर चाकूने हल्ला केला आहे.

  • Share this:

भागलपूर, 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांसोबत हा दिवस साजरा करत असतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्यासमोर आपण व्यक्त होतो. व्हॅलेंटाइन डेला सर्वत्र प्रेमाचं वातावरण बघायला मिळतं. आणि याच दिवशी प्रेमावरूनच 2 तरुणी एकमेकींशी भिडल्याचं कधी ऐकलयं का? होय, चक्क एका मुलावरून 2 तरुणींमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, या तरुणींमधील एकीने दुसरीवर जीवघेणा चाकूहल्ला केला आहे.

हा सर्व प्रकार घडला आहे बिहारमधील भागलपूरमध्ये. भागलपूरमधील तिलकामांझी भागलपूर युनिव्हर्सिटीअंतर्गत येणाऱ्या टीएनबी कॉलेजमध्ये एका तरुणीने दुसरीवर चक्क चाकू हल्ला केला. लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, एका मुलावरून या दोघींमध्ये वाद झाला आणि याच रागातून एकीने दुसरीवर चाकू हल्ला केल्याचं समजत आहे. मुलांमध्ये होणारे वाद हे आपण ऐकतच असतो मात्र आता मुलींमध्ये अशाप्रकारे झालेला वाद ही आश्चर्याची बाब आहे. व्हॅलेंटाइन डेला आपण एकमेकाला आपल्या प्रेमाची कबुली देतो. मात्र आपण ज्यावर प्रेम करतो त्याला मिळवण्यासाठी दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करणं हा धक्कादायक प्रकार आहे.

लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, हल्ला करणारी तरुणी चाकू घेऊन क्लासरूममध्ये आली. तरुणीच्या हातात चाकू बघून क्लासमधील इतर विद्यार्थिनींनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. विद्यार्थिनींनी तरुणीच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने चाकूने हल्ला करू, अशी धमकी दिली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच याची माहिती कॉलेजच्या शिक्षकांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आणि हल्ला करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वाचा -  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, प्रेमी युगुलाचं जबरदस्तीने लावलं लग्न

या हल्ल्यात तरुणी थोडक्यात बचावली आहे. दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार या हल्ला करणारी तरुणी मानिसकदृष्ट्या आजारी असल्याचंही सांगण्यात येत आहे.

व्हॅलेंटाइन डेला असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र इतक्या सहजरित्या कॉलेजमध्ये शस्त्र नेऊन दुसऱ्या तरुणीवर हल्ला केल्याने कॉलेजच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

वाचा - प्रियकराने प्रेयसीला खूश करण्यासाठी तिच्या वडिलांनाच संपवलं

First published: February 14, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading