झारखंड, 5 एप्रिल : त्यागाशिवाय काहीच मिळवणं शक्य नसतं. हे तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र झारखंडमधील बिशूनपूर रोडवरील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या साक्षी श्रीवास्तवने हे खरं करून दाखवलं आहे. आपल्या वडिलांची पेटलेली चिता सोडून आयबीपीएस पीओची परीक्षा देण्यासाठी गेली होती. आणि पहिल्याच प्रयत्नात तिला परीक्षेत यश मिळालं. आता तर तिची नियुक्ती कॅनरा बँकेत पीओ पदावर झाली आहे.
एकाने कर्तव्य केलं पूर्ण तर दुसरीने आदर्श निर्माण केला
साक्षीने डीएवीमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि सेंट झेव्हियर कॉलेज रांचीमधून मॅथ्स ऑनर्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरातच राहून आयबीपीएस स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. 27 फेब्रुवारी रोजी आयबीपीएस पीओची परीक्षा असताना तिचे वडील शैलेंद्र लाल यांचा मृत्यू झाला होता. वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी साक्षीने वडिलांची जळती चिता सोडून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व त्याच यश मिळवलं. तर दुसरीकडे छोट्या बहिणीनेही कर्तव्य सांभाळत आपल्या वडिलांना मुखाग्नी दिली. या दोन्ही बहिणींनी समाजासाठी एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. त्यांची मोठी बहिण स्नेहा श्रीवास्तव हिचं 2015 मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये पीओ पदावर नियुक्ती झाली आहे.
हे ही वाचा-कडक सॅल्यूट! नक्षल हल्ल्यादरम्यान स्वत: जखमी असूनही शीख जवान साथीदारासाठी धावला
तीनही मुलींचा अभिमान आहे
साक्षीची आई शशी सिन्हा म्हणतात की, मला माझ्या तीनही मुलींचा अभिमान आहे. त्यांना कधीच मुलाची कमतरता निर्माण झाली नाही. त्यांनी मुलगा आणि मुलगी दोघांचं कर्तव्य पार पाडलं. साक्षी आपल्या यशामागे आई-बाबा असल्याचं सांगते आणि हे यश वडिलांना श्रद्धांजलीच्या रुपात समर्पिक करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiration