नवरात्राच्या शेवटच्या दिवशी अघटित घडलं; देवासमोर पतीने पत्नीचा दिला नरबळी

देवखोलीत पत्नीचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेला होता

  • Share this:

छत्तीसगड, 26 ऑक्टोबर : नवरात्रीच्या 8 दिवसांच्या उपवासानंतर त्याच रात्री महिलेचं शव तिच्या घरात पुजा घरात दिसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा पतीनेच पत्नीची हत्या केल्याची बाब उघड झाली. यामागील कारण ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पतीने पत्नीचा नरबळी दिल्याचा खुलासा झाला आहे. हा आरोपी काळी जादु करीत होता. ही घटना छत्तीसगडमधील अंबिकापुर जिल्ह्यातील आहे

शहरापासून जवळ असलेल्या सरगंवा गावात शुक्रवारी रात्री पतीने पत्नीची हत्या केली. आरोपीने पत्नीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करीत तिची हत्या केली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन हा नरबळी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आरोपी वारंवार जबाब बदलत आहे. पत्नीच्या चरित्रावर संशय असल्याने तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले.

आरोपी गावात तंत्रमंत्र आणि काळी जादुचं काम करतो. आदल्या रात्री त्याच्या घरी पाहुणे आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर सर्व झोपण्यासाठी गेले. सकाळी जेव्हा आरोपीची सून जागी झाली तेव्हा तिने सांगितले की सासू पुजा घरात मृत अवस्थेत पडली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींनी गावासमोर आपला गुन्हा कबुल केला आहे.

 कुटुंबीयांनी सांगितले की तो पत्नीला वारंवार मारहाण करीत होता. त्याने नवरात्रचे उपवास केले होते. त्यातच त्याने पत्नीचा नरबळी दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 26, 2020, 11:40 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या