Home /News /national /

जगभर पसरतोय 'Indian CEO virus', यावर लस नाही; पराग अग्रवाल यांना आनंद महिंद्रांच्या हटके शुभेच्छा

जगभर पसरतोय 'Indian CEO virus', यावर लस नाही; पराग अग्रवाल यांना आनंद महिंद्रांच्या हटके शुभेच्छा

जॅक डोर्सी यांच्या जागी भारतीय वंशाचे अधिकारी पराग अग्रवाल ट्विटरवर त्यांची जागा घेतील. ट्विटरने याबाबतची घोषणा केली आहे. पराग अग्रवाल सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरचे (Twitter) सह-संस्थापक जॅक डोर्सी (Jack Dorsey) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून पायउतार होत आहेत. त्यांच्या जागी भारतीय वंशाचे अधिकारी पराग अग्रवाल ट्विटरवर (parag agarwal twitter new ceo) त्यांची जागा घेतील. यानंतर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्वीट करत पराग अग्रवाल यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांच्या वरिष्ठ पदी भारतीय असल्याचा आनंदही व्यक्त केला आहे. जॅक डोर्सी यांच्या जागी भारतीय वंशाचे अधिकारी पराग अग्रवाल ट्विटरवर त्यांची जागा घेतील. ट्विटरने याबाबतची घोषणा केली आहे. पराग अग्रवाल सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत. ट्विटरच्या या घोषणेनंतर, विविध टेक फर्ममध्ये भारतीय मोठ्या पदांवर पोहोचल्याची जोरदार चर्चा आहे. या क्रमाने, आयरिश उद्योजक पॅट्रिक कॉलिसन यांनी एका ट्वीटद्वारे आंतरराष्ट्रीय टेक्नोलॉजी कंपन्यांमधील महत्त्वाच्या पदांवर भारतीयांची वाढ अधोरेखित केली. पॅट्रिक यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto Networks आणि आता Twitter चे नेतृत्व भारतीय वंशाचे CEO करत आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे आश्चर्यकारक यश आणि अमेरिका स्थलांतरितांना देत असलेल्या संधी पाहणे आश्चर्यकारक आहे. अभिनंदन पराग." मोठी बातमी! Twitter च्या CEO पदावर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल पॅट्रिक कॉलिसन यांच्या ट्वीटला रिट्वीट कर आनंद महिंद्रा यांनी लिहिलं की "ही एक अशी महामारी आहे ज्याबद्दल आम्हाला सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो की त्याची उत्पत्ती भारतात झाली. हा भारतीय सीईओ व्हायरस आहे... त्याची कोणतीही लस नाही." पराग अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत IIT-Bombay आणि Stanford University चे माजी विद्यार्थी असलेले पराग अग्रवाल 2011 पासून Twitter वर काम करत आहेत आणि 2017 पासून कंपनीचे CTO आहेत. जेव्हा ते कंपनीत सामील झाला तेव्हा कंपनीची कर्मचारी संख्या 1,000 पेक्षा कमी होती. डोर्सी 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत संचालक मंडळावर राहतील. अग्रवाल यांनी ट्विटरवर लिहिले की, या नियुक्तीमुळे मी अत्यंत सन्मानित आणि आनंदी आहे आणि डोर्सी यांच्या "सतत मार्गदर्शन आणि मैत्री" बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Anand mahindra, Twitter

    पुढील बातम्या