नोटबंदी करुन पैसे जप्त करण्याचा आमचा हेतू नव्हता -अरुण जेटली

नोटबंदीमुळे काळ्या पैश्यावर लगाम लावण्यात यश आलंय. सोबतच कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2018 05:21 PM IST

नोटबंदी करुन पैसे जप्त करण्याचा आमचा हेतू नव्हता -अरुण जेटली

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : नोटबंदीला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहे. आजच्या दिवशी २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. या निमित्ताने आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीचं समर्थन करणारा एक ब्लाॅग लिहिला आहे.


नोटबंदीमुळे काळ्या पैश्यावर लगाम लावण्यात यश आलंय. सोबतच कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नोटबंदीचा निर्णय सरकारच्या एका मोठ्या निर्णयाच्या भाग होता त्यामुळे अर्थव्यवस्था ठीक करणे गरजेचं होतं असं जेटली यांनी म्हटलंय.Loading...

नोटबंदीनंतर कर बुडवणे कठीण झाले. नोटबंदीमुळे सर्व पैसा हा बँकेत जमा झाला अशी टीका काही लोकं करत आहे. पण नोटबंदीच निर्णय घेऊन आमचा हेतू हा फक्त पैसा जप्त करणे नव्हता. आम्हाला अपेक्षा होती की लोकांनी कर भरावा असं जेटली यांनी स्पष्ट केलं.नोटबंदीच्या निर्णयामागे कॅशलेसद्वारे लोकांना डिजीटल व्यवहारात आणण्याचा आमचा हेतू होता. नोटबंदीमुळे  टॅक्समधून मिळाले उत्पन्न वाढवण्यास मदत मिळाली अशी माहितीही जेटलींनी केली.


जेटलींनी आपल्या ब्लाॅगमध्ये आर्थिक वर्ष २०१८-१९ (३१-१०-२०१८) पर्यंत जो व्यक्तीगत आयकर जमा झाला तो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०.२ टक्कांनी जास्त आहे.  कॉर्पोरेट टॅक्स 19.5 टक्क्यांनी वाढला. त्याशिवाय

थेट कर गोळा करण्यात 6.6% आणि 9% वाढ झाली आहे.


जेटली यांच्या म्हणण्यानुसार, टॅक्स चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सोबतच त्यांनी नोटबंदीनंतर बँकांना कर्ज देण्याची ताकद वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर म्युचुअल फंडात रक्कम गोळा झाली आहे.


=============================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...