News18 Lokmat

राहुलजी, छोट्या भीमलाही कळतं अॅपवर हेरगिरी होत नाही -स्मृती इराणी

काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्धाचा भडका आता टि्वटरवर उडालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2018 09:30 PM IST

राहुलजी, छोट्या भीमलाही कळतं अॅपवर हेरगिरी होत नाही -स्मृती इराणी

नवी दिल्ली, 26 मार्च : काँग्रेस आणि भाजपमध्ये डेटा चोरीवरून शाब्दिक युद्ध सुरूच आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिग बाॅसची उपमा दिली. त्यामुळे सुचना आणि माहिती प्रसारण मंत्रीस्मृती इराणी यांनी, छोटा भीमला सुद्धा माहिती आहे की अॅपवरून डेटा चोरी होत नाही असा पलटवार केलाय.

काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्धाचा भडका आता टि्वटरवर उडालाय. राहुल गांधी यांनी "मोदींचं नमो अॅपवर गुप्तपणे आॅडिओ आणि व्हिडिओ तसंच तुमची खासगी माहिती रेकाॅर्ड केली जात आहे. जीपीएसद्वारे तुमच्या ठिकाणाची माहिती मिळतेय. हे सगळं भारताचे बिग बाॅस नरेंद्र मोदी करत आहे. असं म्हणत राहुल गांधींनी टि्वट केलं होतं. तसंच डिलीट नमो अॅप असा हॅशटॅग वापरला होता. तसंच 13 लाख एनसीसी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने हा अॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं जातंय असा आरोपही राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींच्या या टि्वटनंतर स्मृती इराणी यांनी जशाच तसे उत्तर दिले. राहुल गांधीजी छोटा भीमला सुद्धा कळतं की अॅपवर मागितली जाणारी माहिती ही हेरगिरी नाही. राहुल गांधी जी हे काय ? तुम्हाला तुमची टीम जे सांगतेय त्यांच्या उलट होत चाललंय. आता तुमचंच अॅप डिलीट झालंय असा टोला स्मृती इराणी यांना लगावला.

तसंच तुमच्या अॅपसाठी मग सिंगापूरचं सर्व्हर का वापरले जात आहे. त्या सर्व्हरवर डेटा का पाठवला जातोय. तिथे कुणी टाॅम, डिक वगैरे वगैरे डेटा अॅनालिटिकाला पोहोचवत आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 09:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...