मराठी बातम्या /बातम्या /देश /

ओमायक्रोनची दहशत, केंद्राच्या सूचना, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात नाईट कर्फ्यू लागू

ओमायक्रोनची दहशत, केंद्राच्या सूचना, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात नाईट कर्फ्यू लागू

ओमायक्रोनबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने सर्व राज्यांना ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

ओमायक्रोनबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने सर्व राज्यांना ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

ओमायक्रोनबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने सर्व राज्यांना ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Published by:  Chetan Patil

भोपाळ, 23 डिसेंबर : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे ओमायक्रोनबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने सर्व राज्यांना ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नाईट कर्फ्यू आणि सणांवर निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. गर्दी जमू नये यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या सूचनांनंतर लगेच महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच मध्यप्रदेशात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरात ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू होणारं मध्यप्रदेश हे पहिलं राज्य आहे. मध्यप्रदेशात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एकही ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळलेला नाही. तरीही मध्यप्रदेश सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय घेतला आहे.

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राज्यांना सूचना

कोरोनाच्या ओमायक्रोन नव्या या विषाणूचा संसर्ग भारतातही शेफारत आहे. देशातील तब्बल 16 राज्यांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार देशात 269 जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे संभाव्य भीतीचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज आढावा बैठक आयोजित केली होती. केंद्र सरकारने ओमायक्रोनला रोखण्यासाठी सर्व राज्यांना नाईट कर्फ्यूपासून ते सणासुदीला गर्दी जमू नये यासाठी निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली

केंद्र सरकारच्या राज्यांना पाच महत्त्वपूर्ण सूचना :

1) नाईट कर्फ्यू लावा, गर्दीवर आळा घाला, गर्दीला रोखा. विशेषत: येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यावर कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन निश््चित करा.

2) टेस्टिंग आणि सर्वेलांसवर विशेष लक्ष द्या. आयसीएआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचित केलेल्या नियमांनुसारच टेस्टिंग व्हावी. डोअर टू डोअर टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवा

3) रुग्णालयांमधील बेड्ससर सर्व उपकरणांची संख्या वाढवा. ऑक्सिजनचा स्टॉक वाढवा. पुढच्या 30 दिवसांचा ऑक्सिजनचा साठा साठवून ठेवा.

4) परिस्थितीवर योग्य माहिती द्यावी, प्रेस ब्रफिंग व्हावी, जेणेकरुन गैरसमज पसरणार नाही.

5) 100 टक्के लसीकरणावर फोकस करा.

हेही वाचा : बायकोच्या महाभयंकर आजाराबाबत समजताच नवरा हादरला; उचललं टोकाचं पाऊल

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली

दुसरीकडे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या चक्क दुपटीने वाढली आहे कोरोना हा गुणाकार करतो. एकदा रुग्णसंख्या वाढायला लागली तर ती दुप्पट किंवा तीनपटीने वाढायला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.  मुंबईत आज 602 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काल (22 डिसेंबर) हीच संख्या 490 इतकी होती. त्याआधी हीच संख्या 327 इतकी होती. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज आता वाढताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत आज कोरोनामुळे एका रुग्णाची मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे मुंबईत आज दिवसभरात 207 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 2813 इतकी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा 1747 इतका आहे.

First published: