Home /News /national /

Omicron : भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवासासाठी नवे नियम लागू होणार, जाणून घ्या पूर्ण गाईडलाईन्स

Omicron : भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवासासाठी नवे नियम लागू होणार, जाणून घ्या पूर्ण गाईडलाईन्स

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी संसदेत नव्या नियमावलीची माहिती दिली. ओमायक्रॉनचा (Omicron) संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

  मुंबई, 30 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रीकेत (South Africa) आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन (Omicron) हा खूप जलद गतीने जगभरातील अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूंपेक्षा जास्त घातक असल्याचं बोललं जात आहे. भारतात या विषाणूने बाधित असलेला एकही रुग्ण आतापर्यंत आढलेला नाही. पण हवाई आणि जल वाहतुकीने प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांमुळे (Passengers) कदाचित या विषाणूचा धोका उद्भवू शकतो. याच धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Indian Government) सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाच्या नियमावलीत बदल केले आहेत. ही नियमावली (India New Travel Rules) केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली देशभरात लागू होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत आज संसदेत माहिती दिली. ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व विमानतळ आणि बंदरांवर बारकाईने बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. कुणी संशियत आढळल्यास तातडीने जीनो सीक्वेंसिंग केली जात आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा : आदित्य ठाकरे-संजय राऊत यांनी घेतली ममतादीदींची हॉटेलमध्ये भेट!

  केंद्र सरकारने जारी केलेली नवी नियमावली पुढीलप्रमाणे:

  ज्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे अशा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत त्यांची विमानतळावर राहण्याची सुविधा करण्यात यावी. प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा त्यांची टेस्ट केली जाईल. राज्यातील अधिकारी अशा प्रवाशांच्या घरी जावून याबाबतची व्यवस्था करतील. ज्या प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाचे सॅम्पल जीनोम सीक्वेंसिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत तातडीने पाठण्यात यावे. याशिवाय राज्यातील संक्रमित व्यक्तींची माहिती घ्यावी. तसेच 14 दिवस पूर्ण झाल्यानंतरही त्यांचा फॉलोअप घ्यावा. हेही वाचा : फक्त परळीचं वैद्यनाथ मंदिरच नाही तर 100 देवस्थानांना बॉम्बने उडविण्याची धमकी? प्रत्येक राज्याने आपापल्या विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवावं. आता पुन्हा टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि वॅक्सिनेट या रणनितीवर जोर दिला जातोय. सर्व राज्यांना वेगाने टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओमायक्रोन विषाणूची ओळख आरटीपीसाआर किंवा रॅपिड अॅटिजेन टेस्टमधून होऊ शकते. ज्या परिसरात मागच्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ होताना दिसतेय अशा भागात सर्वाधिक लक्ष देण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलं आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या