Home /News /national /

Coronavirus: दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव, टांझानियावरुन दिल्लीत परतलेल्या प्रवाशाला Omicron ची लागण

Coronavirus: दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव, टांझानियावरुन दिल्लीत परतलेल्या प्रवाशाला Omicron ची लागण

omicron cases in India: ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता भारतातील आणकी एका व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 5 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron variant) चिंता वाढवली आहे. परदेशातून भारतात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. टांझानियाहून दिल्लीत परतलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनची लाकण झाली आहे. यामुळे आता राजधानी दिल्लीतही चिंता वाढली आहे. (Coronavirus Omicron case reported in Delhi) दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने दिल्लीत शिरकाव केला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टांझानियाहून परतलेल्या व्यक्तीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल आला असून तो ओमायक्रॉन बाधित असल्याचं समोर आलं आहे. या बाधित रुग्णावर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा : परदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या कोविड रिपोर्टमध्ये आढळला हा Corona variant भारतात ओमायक्रॉनचा पाचवा रुग्ण भारतात ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता पाचवर गेली आहे. सर्वप्रथम कर्नाटकमध्ये दोन ओमायक्रॉन बाधित आढळून आले. त्यानंतर गुजरातमध्ये एकाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर परदेशातून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. तर आता देशाची राजधानी दिल्लीतील व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. कर्नाटक - 2 जणांना ओमायक्रॉन संसर्ग गुजरात - 1 व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग महाराष्ट्र - डोंबिवलीतील एका व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग दिल्ली - 1 व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे. वाचा : कोरोनाची लस न घेता दक्षिण आफ्रिका, दुबई व्हाया डोंबिवली, omicron positive रुग्णाची धक्कादायक माहिती धारावीवर ओमायक्रॉन व्हेरिएंटचं सावट? पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथुन आलेला एक व्यक्ती धारावी येथे वास्तव्यास आहे. या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यावर त्याला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे की नाही याचा खुलासा होईल. मात्र, यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Delhi, Maharashtra

    पुढील बातम्या