Home /News /national /

बापरे.. क्षणार्धात कोसळली भिंत, तीन तरुण थोडक्यात वाचले; थरारक Video व्हायरल

बापरे.. क्षणार्धात कोसळली भिंत, तीन तरुण थोडक्यात वाचले; थरारक Video व्हायरल

Dausa OMG Video: तीन तरुणांना त्यांच्या समोर येणाऱ्या संकटाची सुतराम कल्पनाही नव्हती. हे तिघे चालत असताना अचानक धक्कादायकरित्या एक भिंत कोसळते. भिंत पडताना पाहून हे तीन तरुण वेगाने धावले, अन्यथा ते त्याखाली दबले गेले असते.

    दौसा, 01 सप्टेंबर : अनेकदा नकळतपणे आपल्यावर एखादे भयानक संकट ओडावते. त्यातून काहीजण सहीसलामत बचावतात मात्र ती घटना आपण जन्मभर विसरू शकत नाही. असाच काहीसा प्रकार तीन तरुणांच्या बाबतीत घडला आहे. व्हिडिओमध्ये (viral Video) आपण बघू शकाल की, रस्त्यावरून गप्पा मारत निघालेल्या तीन तरुणांना त्यांच्या समोर येणाऱ्या संकटाची सुतराम कल्पनाही नव्हती. हे तिघे चालत असताना अचानक धक्कादायकरित्या एक भिंत कोसळते. भिंत पडताना पाहून हे तीन तरुण वेगाने धावले, अन्यथा ते त्याखाली दबले गेले असते. अवघ्या काही क्षणांचा विलंब या तरुणांना भारी पडला असता. सुदैवानं हे तिन्ही तरुण सुखरूप बचावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा अपघात राजस्थानच्या दौसा शहरात दोन दिवसांपूर्वी सोमवारी घडल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोमवारी संध्याकाळी सुमारे 7.45 चा आहे. त्यावेळी शहरातील बजरंग मैदानाजवळील एक भिंत कोसळली. अपघातावेळी तीन तरुण बजरंग मैदानासमोरील रस्त्यावरून जात होते. भिंतीजवळ एक कारही उभी होती. या अपघातात भिंत पडताच तिन्ही तरुणांनी पळून जाऊन त्यांचे प्राण वाचवले. तीन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाल्याने भिंतीखाली येण्यापासून थोडक्यात बचावले. या अपघातात भिंतीखाली उभ्या असलेल्या कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. बापाची युक्ती अन् लेकाची मुक्ती; हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला वडिलांनी असं काढलं बाहेर सगळीकडे उडाली धूळ भिंत पडताच मोठ्या प्रमाणात धूळही उडाली. ही धूळ पाहून आपण अंदाज लावू शकतो, की भिंत किती मोठी होती आणि किती वेगाने पडली. या घटनेत बचावलेले हे तीन तरुण चांगलेच घाबरले होते. तिघेही लगेचच भिंतीखालून बाजूला झाल्याने बचावले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तेथे लोकांची गर्दी झाली होती. नंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. खाली पडलेली भिंत खूप जुनी असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचा हा व्हायरल व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Live video viral, Shocking viral video

    पुढील बातम्या