OMG VIDEO : फ्रान्स ते रामपूर! थरारक स्टंट्स करणारे 'पार्कोर परिंदे'

रामपूर ... ! उत्तर प्रदेशातलं हे शहर मुघल काळातल्या जुन्या इमारती आणि चाकूंसाठी प्रसिद्ध आहे. पण याच शहरात काही तरुणांनी वादळ आणलं आहे. हे तरुण एका वेगळ्याच प्रकारचे स्टंट करतात. मूळचा फ्रान्सचा असलेला हा खेळ रामपूरचे हे तरुण शिकले तरी कसे ?

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 08:34 PM IST

OMG VIDEO : फ्रान्स ते रामपूर! थरारक स्टंट्स करणारे 'पार्कोर परिंदे'

मुंबई, 25 जुलै : रामपूर ... ! उत्तर प्रदेशातलं हे शहर मुघल काळातल्या जुन्या इमारती आणि चाकूंसाठी प्रसिद्ध आहे. पण याच शहरात काही तरुणांनी खळबळ निर्माण केली आहे. हे तरुण एका वेगळ्याच प्रकारचे स्टंट करतात.

इमारती, भिंतींवरून लांब उड्या घेत जायचं, कोलांट्या उड्या मारायच्या आणि ठरलेल्या ठिकाणी जवळचा रस्ता घेत वेगाने पोहोचायचं, असा हा स्टंट आहे. रामपूरमध्ये या स्टंटची सुरुवात केली, मुजाहिदने. त्यांचे हे स्टंट पाहून त्याचा एक मित्र त्याला एकदा म्हणाला, तुम्ही हे स्टंट करता त्याला पार्कोर असं म्हणतात आणि या खेळाची सुरुवात झाली ती फ्रान्समध्ये. हा व्हिडिओ बघून तर मुजाहिदला आणखीनच स्फुरण चढलं. फ्रान्समधले हे व्हिडिओ बघतबघत मग त्याने हे स्टंट करण्याची शास्त्रीय पद्धत शिकून घेतली आणि मित्रांनाही शिकवली.

मुजाहिद आणि त्याच्या मित्रांचे हे वॉल स्पिन स्टंट, वॉल फ्लिप स्टंट पाहिलेत तर तुम्ही थक्क व्हाल. पण हे बघून तुम्ही तुमच्या बागेत किंवा रस्त्यावर मात्र हे करू नका. असे स्टंट्स करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं.

भिंतीच्या आधाराने कोलांटउड्या घेताना किंवा हाय जम्प मारताना शरीराला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ते एक तंत्र आहे.

Loading...

'किशोरवयात कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं व्यक्त खंत

जॅकी चॅनला गुरू मानणारा मुजाहिद रामपूरमध्ये याचं प्रशिक्षण देतो. आता त्याचे विद्यार्थी चांगले तयार झाले आहेत. काही जण तर सीआरपीएफच्या जवानांसोबतही काम करतात. काही विद्यार्थ्यांनी पार्कोर शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट्सही काढल्या आहेत.

आपलं पॅशन हेच या तरुणांनी प्रोफेशन बनवलं आहे. पार्कोर खेळामध्ये यूएस आणि रशियामधून बेस्ट अ‍ॅथलिट तयार होतात. तसेच अ‍ॅथलिट भारतातूनही तयार होतील आणि जगात नाव कमावतील, असा विश्वास मुजाहिदला आहे.

(असे स्टंट्स तुम्ही योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय करू नका.)

==========================================================================================================

SPECIAL REPORT : मिशन राष्ट्रवादीला खिंडारमध्ये आदित्य ठाकरेंनी बजावली मोठी भूमिका!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...