मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमेरिका रिटर्न शेतकऱ्याने थेट छतावर ठेवला ट्रॅक्टर, थोडेथोडके नव्हे तर खर्च केले 6 लाख

अमेरिका रिटर्न शेतकऱ्याने थेट छतावर ठेवला ट्रॅक्टर, थोडेथोडके नव्हे तर खर्च केले 6 लाख

शेती आणि शेतकऱ्यांचा (Farmers) सन्मान म्हणून राजस्थानमधल्या (Rajasthan) एका अनिवासी भारतीय (NRI) शेतकऱ्याने अनोखं पाऊल उचललं आहे. शेतकरी कुटुंबातील या व्यक्तीनं नव्या घराच्या शेवटच्या मजल्यावर ट्रॅक्टर (Tractor) ठेवला आहे.

श्रीगंगानगर, 06 फेब्रुवारी: शेती आणि शेतकऱ्यांचा (Farmers) सन्मान म्हणून राजस्थानमधल्या (Rajasthan) एका अनिवासी भारतीय (NRI) शेतकऱ्याने अनोखं पाऊल उचललं आहे. शेतकरी कुटुंबातील या व्यक्तीनं नव्या घराच्या शेवटच्या मजल्यावर ट्रॅक्टर (Tractor) ठेवला आहे. सध्या हा ट्रॅक्टर चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी मी हे पाऊल उचलल्याचं या एनआरआय शेतकऱ्यानं म्हटलं आहे.

राजस्थानमधल्या श्रीगंगानगर येथील एका शेतकऱ्याच्या अनिवासी भारतीय मुलाने 33 वर्षं जुना ट्रॅक्टर घराच्या छतावर (Trackter On the roof of the house) ठेवला आहे. अनुपगड तालुक्यातील रामसिंगपूर भागात राहणाऱ्या अंग्रेजसिंह यांनी 6 लाख रुपये खर्च करत ट्रॅक्टरची दुरुस्ती आणि पेटिंग करून घेतलं. त्यानंतर हा ट्रॅक्टर मोठ्या क्रेनच्या (Crane) सहाय्याने घराच्या छतावर ठेवण्यात आला. अंग्रेजने या ट्रॅक्टरमध्ये लाईटस आणि म्युझिक सिस्टिमही बसवली आहे. अमेरिकेतून परतलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा हा ट्रॅक्टर दूरूनच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी हे केल्याचं अंग्रेज सिंह याने म्हटलं आहे.

हे वाचा-VIDEO : मारहाणीमुळे 8 महिन्यांच्या बाळाला ब्रेन हॅमरेज; केअरटेकरचं भयंकर कृत्य

रामसिंगपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 58 जीबी गावात, एका अनिवासी भारतीय शेतकऱ्यानं त्याच्या नवीन बांधलेल्या घरात स्थलांतरित होण्यापूर्वी क्रेनच्या मदतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर ट्रॅक्टर ठेवला. अनिवासी भारतीय शेतकरी अंग्रेज सिंह मल्ली यांनी सुमारे 6 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर विकत घेतला आणि तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आधुनिक क्रेनच्या सहाय्याने नवीन घराच्या तिसऱ्या मजल्यावर ठेवला. एवढेच नाही तर तिसऱ्या मजल्यावर ठेवलेला हा ट्रॅक्टर खराब होऊ नये, यासाठी रिमोटच्या (Remote) साहाय्याने तो दररोज सुरू करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ छतावर ठेवला ट्रॅक्टर

1992 पासून अमेरिकेत (America) राहत असलेले अनिवासी भारतीय शेतकरी अंग्रेज सिंह मल्ली यांनी सांगितलं की, 'प्रत्येक शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर हा महत्त्वपूर्ण आणि पूजनीय असतो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी आपल्या शेतात पिकं घेतात आणि याच पिकामुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलते. त्यामुळे आम्ही नव्याने बांधलेल्या घराच्या शेवटच्या मजल्यावर ट्रॅक्टर ठेवून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. मला लहानपणापासूनच बुलेट, मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची खूप आवड होती. आपल्या घराच्या गच्चीवर ट्रॅक्टर ठेवावा, असं माझं स्वप्न होतं. आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे', असं अंग्रेज सिंह यांनी सांगितलं.

हे वाचा-निळ्या रंगाच्या झाडाचा PHOTO VIRAL; पण सत्य जाणून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

'ट्रॅक्टर हे शेती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचं प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीनं मग तो शेतकरी असो अथवा इतर कोणी व्यापारी, आपलं स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्याने पूर्ण झोकून देऊन काम केलं पाहिजे', असं अंग्रेज सिंह मल्ली यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Farmer