फक्त 12 दिवसांत आश्चर्य घडलं! गंगेच्या पाण्याची गुणवत्ता सुधरली, पूर्ण होणार मोदींच स्वप्न

फक्त 12 दिवसांत आश्चर्य घडलं! गंगेच्या पाण्याची गुणवत्ता सुधरली, पूर्ण होणार मोदींच स्वप्न

कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा 'नमामि गंगा' प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर

  • Share this:

वाराणसी, 05 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामाविना बाहेर जाण्यास नागरिकांना परवानगी नसल्यानं त्याचे अनेक परिणाम पाहायला मिळत आहेत. अनेक रस्त्यावर प्राणी पक्षी मुक्त संचार करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांशी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा अनेक गोष्टींवर जसे साईट इफेक्ट झाले तसे काही अंशानं इफेक्टही पाहायला मिळाले आहेत. लॉकडाऊनआधी नमामि गंगे या योजनेंतर्गत गंगा स्वच्छता अभियान राबवण्यात येत होतं मात्र तरीही तितका परिणाम होत नव्हता. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊनंतर धर्मस्थळ आणि तिर्थक्षेत्र ओस पडली आहेत. पर्यटकांनाही तिथे येण्यास बंदी आली. 12 दिवसांच्या लॉकडाऊमध्ये जवळपास गंगेच्या पाण्याची शुद्धता 50 टक्क्यांनी सुधारली आहे. हा लॉकडाऊन असाच सुरू राहिला तर स्वच्छ गंगा हा मोदींचा प्रकल्प नक्की पूर्ण होईल. म्हणजेच 100 टक्के पाणी शुद्ध होईल यात शंका नाही.

गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.लॉकडाउनच्या मागील दहा दिवसातच गंगेच्या पाण्याची गुणवत्ता 50 टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचे इफेक्ट दिसायला लागले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि राजीव गांधी उद्यानात मोर आणि हरणं पाहायला मिळाली होती.

First published: April 5, 2020, 1:46 PM IST

ताज्या बातम्या