7 मुलांची आई आणि 7 जणांची आजी पडली प्रेमात; 22 वर्षाच्या युवकाबरोबर गेली पळून

7 मुलांची आई आणि 7 जणांची आजी पडली प्रेमात; 22 वर्षाच्या युवकाबरोबर गेली पळून

प्रेमाला वय नसतं, प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण 60 वर्षांच्या आजीबाई 22 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडल्या आणि पोलिसांसमोरच सगळा गोंधळ उलगडला तेव्हा याचा खरा प्रत्यय आला.

  • Share this:

आग्रा, 24 जानेवारी : प्रेमाला वय नसतं, प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण याचा शब्दशः प्रत्यय एका घटनेत पोलिसांनाच आला. पोलीस ठाण्यातच एक अनाकलनीय प्रेमकहाणी उलगडली. 60 वर्षांच्या आजीबाई 22 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडून घरातून पळून गेल्या. त्यांच्या पतीने आणि मुलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर त्या आपल्या प्रेमिकाबरोबर पोलीस ठाण्यात हजरही झाल्या. या प्रेमाच्या गोंधळामुळे कुणाविरोधात आणि काय तक्रार दाखल करायची याचा पोलिसांनाही काही काळ प्रश्न पडला होता.

उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यातल्या एका गावातली ही घटना काही हिंदी वेबसाइटवर बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे. बायको घरातून गायब झाली आणि एक तरुणही गायब झाल्याची तक्रार या स्त्रीच्या पतीने आणि तिच्या मुलांनी पोलीस स्टेशन गाठलं. त्या युवकाविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. हे समजताच तो युवकही आपल्या परिवारासह पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आपलं या 60 वर्षांच्या स्त्रीवर खरंखुरं प्रेम असल्याचं त्यानं सांगितलं. आपण लग्नही करणार असल्याचं त्यानं सांगितलं. त्या स्त्रीच्या कुटुंबीयांनीही तिला समजावलं पण दोघेही प्रेमी कुणाचं ऐकायच्या मनस्थितीत नव्हते.

हेही वाचा - पतीने बोलावलं कॉलगर्लला अन् निघाली ती बायको, अमरावतीत घडली नात्याची भयंकर घटना

या स्त्रीला 7 मुलं आहेत आणि त्यातल्या काहींची लग्नही झालेली आहेत. उतार वयात प्रेमात पडलेली ही स्त्री 7 नातवंडांची आज्जी आहे. पण प्रेमाला वयाचं बंधन नसतं म्हणतात ते खरं. ही महिला या वयातही आपल्यापेक्षा तिपटीने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी तिने घरही सोडलं. पोलिसांसमोरच ही घटना उघड झाली. हे दोघे याअगोदरही न सांगता गायब झाल्याचंही या वेळी स्पष्ट झालं.

हेही वाचा - 'मी स्मोकर, अल्कोहोलिक होतो...' ज्येष्ठ अभिनेत्यानं उलगडलं पडद्यामागचं आयुष्य

अशा प्रकारे न सांगता घरातून निघून गेल्याबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराची शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी अखेर त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. FIR दाखल केल्याने प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचलं. या प्रकरणात संबंधित व्यक्तींची बदनामी होऊ नये म्हणून नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: agralove
First Published: Jan 24, 2020 10:38 AM IST

ताज्या बातम्या