370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा फोटो व्हायरल

370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा फोटो व्हायरल

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये दाढी वाढलेले ओमर अब्दुल्ला दिसत आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 25 जानेवारी : जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर इंटरनेटसह अनेक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. आता 20 जिल्ह्यामधील 2जी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये दाढी वाढलेले ओमर अब्दुल्ला दिसत आहेत. नेहमी दाढी केलेले ओमर अब्दुल्ला यांना यामध्ये ओळखणं कठिण आहे. याआधीही त्यांचा थोडी दाढी वाढलेला फोटो समोर आला होता.

ओमर अब्दुल्ला सध्या श्रीनगरमध्ये हरी निवास इथं पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. ओमर अब्दुल्ला यांना गुप्कार रोडवरील त्यांच्या घरी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासनाने पुन्हा त्यांचा निर्णय मागे घेतला होता.

ओमर अब्दुल्लांना गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ओमर अब्दुल्ला यांच्यासह त्यांचे वडिल फारुख अब्दुल्ला हेसुद्धा नजर कैदेत आहेत.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेले ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्षही आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याआधी ओमर अब्दुल्ला सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांचे फोटो पोस्ट करत तसेच अनेक मुद्यांवर ते मत व्यक्त करायचे.

तुम्ही रस्त्यात उभं राहून सेल्फी काढता का? हा VIRAL VIDEO आधी पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 07:33 PM IST

ताज्या बातम्या