VIDEO : 'इन्शाह अल्लाह! जम्मू काश्मीरचा पुन्हा स्वतंत्र पंतप्रधान असेल'

'काश्मीरने विलीनीकरणानंतरही आपली स्वतंत्र ओळख राहील अशी अट ठेवली होती.'

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 07:42 PM IST

VIDEO : 'इन्शाह अल्लाह! जम्मू काश्मीरचा पुन्हा स्वतंत्र पंतप्रधान असेल'

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढतच चालली आहेत. अकबर लोन यांच्यानंतर आता पक्षाच्या अध्यक्षानींच एका सभेमध्ये बोलताना काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असेल असं म्हटलं आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले की, इतर राजवटी कोणत्याही अटींशिवाय देशात विलिन झाल्या. मात्र, काश्मीरने स्वत:ची वेगळी ओळख राहील, संविधान असेल अशी अट ठेवली होती.अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीरमध्ये सदर ए रियासत आणि वजीर ए आलम सुद्धा होते. इंशाह अल्लाह! जम्मू काश्मीरचा पुन्हा स्वतंत्र पंतप्रधान असेल.

Loading...

याआधी माजी आमदार जावेद अहमद राणा यांनीही पूंछ येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. जावेद राणा म्हणाले होते की, खुदा कसम, मी या देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध जम्मू आणि काश्मीरसह देशात जितके खून झालेत त्या सगळ्यांचा गुन्हा दाखल करेन.

एका सभेत बोलताना राणा म्हणाले होते की, जेव्हा मला पाकिस्तानला कधी जाणार असे विचारले तेव्हा मी सांगितलं की पाकिस्तानला कशाला जायला हवं. मोदींनी भारतालाच पाकिस्तान केलं आहे. मोदींनी देशात इतके खून, लूट आणि द्वेष पसरवला आहे की भारताचा पाकिस्तान झाला आहे.

दहशतवादाचा अर्थ कोणी मला विचारला तर मी मोदी असं उत्तर देईन असंही जावेद राणा यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, पक्षाचे वरिष्ठ नेते मोहम्मद अकबर लोन यांनी कुपवाडातील एका सभेवेळी विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा देईन असं म्हटलं होतं. कोणी एक शिवी दिली तर मी दहा देईन असंही त्यांनी म्हटलं होतं.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...