दिल्ली, 23 फेब्रुवारी : आमची लढाई ही काश्मिरींविरोधात नसून काश्मीरसाठी असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोंक तेथील सभेत केलं. त्यानंतर जम्मू - काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. या ट्विटमध्ये ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं अभिनंदन करताना 'आज तुम्ही आमच्या मनातील गोष्ट बोललात' असं म्हटलं आहे.
Thank you @narendramodi Sahib. Aaj aap ne hamaray dil ki baat keh di. pic.twitter.com/MNYGk312yI
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 23, 2019
">
काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
'आमची लढाई काश्मिरी लोकांच्या विरोधात नसून काश्मीरसाठी आहे' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मिरी विद्यार्थी आणि लोकांविरोधात लोकांमध्ये राग दिसून येत आहेत. परिणामी काश्मिरींना मारहाण झाल्याच्या अनेक घटना देखील देशभरातून समोर आल्या आहेत. या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. काश्मिरींना सध्या देशातील अनेक भागात मारहाण होत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. आमची लढाई ही काश्मिरींच्या विरोधात नसून काश्मीरसाठी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी म्हटलं आहे.
इम्रान खान यांना सुनवालं
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना देखील काश्मीरच्या मुद्यावर झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. 'इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. तेव्हा मी त्यांना आत्तापर्यंत आपण खूप भांडलो. आता गरिबी आणि अशिक्षितपणाच्या मुद्याविरोधात भांडून त्यांना संपवूया' असं म्हटलं होतं. त्यावेळी इम्रान यांनी देखील त्याला होकार दिला होता. आता दिलेला शब्द पाळण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
VIDEO : 'बाळासाहेब ठाकरे मर्द तर उद्धव घुटनेटेकू', अबू आझमींची जहरी टीका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.