मराठी बातम्या /बातम्या /देश /ओमानमध्ये COVAXIN ला मंजुरी, भारतीयांना क्वारंटाईनची अट रद्द

ओमानमध्ये COVAXIN ला मंजुरी, भारतीयांना क्वारंटाईनची अट रद्द

भारतात तयार झालेल्या COVAXIN लसीला (Oman approves Covaxin for emergency use relief for Indians) ओमान देशानं मान्यता दिली आहे.

भारतात तयार झालेल्या COVAXIN लसीला (Oman approves Covaxin for emergency use relief for Indians) ओमान देशानं मान्यता दिली आहे.

भारतात तयार झालेल्या COVAXIN लसीला (Oman approves Covaxin for emergency use relief for Indians) ओमान देशानं मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : भारतात तयार झालेल्या COVAXIN लसीला (Oman approves Covaxin for emergency use relief for Indians) ओमान देशानं मान्यता दिली आहे. त्यामुळे ओमानला जाणाऱ्या हजारो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ओमानमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांना आता (No need for Indians to get quarantine) क्वारंटाईन होण्याची गरज भासणार नाही. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांसाठी (Relief for covaxin takers) हा विशेष दिलासा मानला जात आहे.

लसीकरण झालेल्यांना दिलासा

कोव्हॅक्सिनची लस घेऊन 14 दिवस झालेल्यांना ओमानमध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर 14 दिवसांनी जर कुणी भारतीय नागरिक ओमानमध्ये आला, तर त्याला क्वारंटाईन करण्यात येणार नाही, अशी घोषणा ओमानच्या वतीनं कऱण्यात आली आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या कोव्हिशिल्ड या लसीला अगोदरच ओमानमध्ये मान्यता आहे. केवळ कोव्हॅक्सिन घेतलेल्यांच्या प्रवासावर मर्यादा येत होत्या. मात्र त्या आता दूर झाल्या आहेत.

WHO च्या मंजुरीकडे लक्ष

जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र अद्याप कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिलेली नाही. मंगळवारी झालेल्या बैठकीत ही मान्यता दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीनंतरही भारतीयांचा हिरमोडच झाला. अद्याप मान्यता मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसून आणखी काही आठवडे भारतीयंना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तीन नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भारत बायोटेकसोबत बैठक होणार असून त्यात या लसीला मान्यता मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

हे वाचा- पुन्हा चीनमध्ये कोरोनाच्या हाहाकाराला सुरुवात!ब्रिटनमध्ये 'या' व्हेरिएंटचा हल्ला

का होतोय उशीर?

कुठल्याही लसीला मान्यता देणं, ही अत्यंत किचकट आणि गुंतागुतींची प्रक्रिया असते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. एखाद्या लसीचा जगभरातील कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे लसीला मान्यता देण्याअगोदर त्याच्या चाचण्या, त्यांचे तपशील, लसींची परिणामकारकता अशा सर्व बाबींचा बारकाईने विचार केला जातो.

First published:

Tags: Corona vaccination, Covid19, Who