लोकसभेच्या नव्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार, मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 11:53 AM IST

लोकसभेच्या नव्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार, मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली, 19 जून : भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता ओम बिर्ला यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस. एस. अहलूवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावंदेखील लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होती. पण, या सर्वांची नावे मागे पडली आणि ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आला. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, 2014मध्ये सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. पण, 2019ची लोकसभा निवडणूक न लढवल्यानं त्यांच्या जागी आता ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.


VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...