मराठी बातम्या /बातम्या /देश /

वृद्धेनं 3 मजली इमारतीसह कोट्यवधीची संपत्ती केली रिक्षाचालकाच्या नावावर, कारण वाचून पाणवतील डोळे

वृद्धेनं 3 मजली इमारतीसह कोट्यवधीची संपत्ती केली रिक्षाचालकाच्या नावावर, कारण वाचून पाणवतील डोळे

(Photo-Aaj Tak)

(Photo-Aaj Tak)

एका वृद्ध महिलेनं निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या कुटुंबाला अनोख बक्षिस दिलं आहे. तिने 3 मजली इमारतीसह आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती एका रिक्षाचालकाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

कटक, 14 नोव्हेंबर: पैशांच्या मागे धावणारं हे जग मानवता आणि प्रेम ही मुल्ये विसरूनच गेला आहे. पण एका वृद्ध महिलेनं गेल्या पंचवीस वर्षांपासून निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या एका कुटुंबाला अनोख बक्षिस दिलं आहे. संबंधित महिलेनं तीन मजली इमारतीसह आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती एका रिक्षाचालकाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेच्या या निर्णयामुळे तिचे नातेवाईक भलतेच नाराज झाले असून त्यांनी याला विरोध केला आहे. पण संबंधित महिला आपल्या निर्णयावर अटळ आहे. घरातील सर्व दागिने, तीन मजली इमारत, घरातील महागड्या वस्तू अशी एकूण जवळपास 1 कोटींची संपत्ती रिक्षाचालकाच्या नावावर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिलेचं नाव मिनाती पटनायक असून त्या ओडिशा राज्यातील कटक जिल्ह्यातील सुताहटा परिसरातील रहिवासी आहेत. गेल्या वर्षी मिनाती यांचे पती कृष्ण कुमार पटनायक यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांत मिनाती यांची मुलगी कोमल हिचाही हृदय विकाराच्या झटक्याने अंत झाला. घरातील दोघांचा मृत्यू झाल्यानंतर मिनाती या एकट्या पडल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना एकटं सोडून दिलं होतं. दरम्यान या निराधर महिला आधार देण्याचं काम संबंधित रिक्षाचालकानं आणि त्याच्या कुटुंबानं केलं आहे.

हेही वाचा-नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित

अगदी रुग्णालयात जाण्यापासून तर घरातील विविध कामं करून देण्यासाठी त्यांनी वृद्ध महिलेची निस्वार्थपणे सेवा केली आहे. त्यांच्या प्रमाणिक आणि निस्वार्थी सेवा करण्याच्या स्वभावामुळे संबंधित वृद्ध महिलेनं सर्व संपत्ती रिक्षाचालकाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षाचालक बुद्धा सामल गेल्या 25 वर्षांपासून पटनायक कुटुंबाची सेवा करत आहे. मिनाती यांची मुलगी कोमल लहान असल्यापासून तिला शाळेत सोडवण्यापासून तिची सर्व काळजी रिक्षाचालक बुद्धा घेत आहे. पटनायक कुटुंबाला आपलं कुटुंब मानून त्यांनी निस्वार्थ भावनेनं कुटुंबाला आधार दिला आहे.

हेही वाचा-सांगोला: अपघात घडवून 45लाखांचं सोन्याचं बिस्किट पळवलं; मित्रच निघाला मास्टरमाइंड

याबाबत अधिक माहिती देताना मिनाती यांनी सांगितलं की, त्यांच्या बहिणीनं या निर्णयाला विरोध केला आहे. अशाप्रकारे करोडे रुपयांची संपत्ती रिक्षाचालकाला दान देण्याच्या निर्णयामुळे ती नाराज झाली आहे. पण लेक कोमलचा मृत्यू झाल्यानंतर, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मला भेटायला आली नाही. त्यांनी साधी माझी विचारपूसही केली नाही. पण या रिक्षाचालकानं गेल्या 25 वर्षांपासून आम्हाला आधार दिला आहे. माझ्या मृत्यूनंतर ही संपत्ती रिक्षाचालकाला मिळण्यात काही अडचणी येऊ नयेत, म्हणून मी हा  निर्णय घेतला असल्याची मिनाती यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Odisha