'ट्राफिक' नियमांपासून वाचण्यासाठी खास 'जुगाड', पोलिसही चक्रावले, VIDEO व्हायरल

'ट्राफिक' नियमांपासून वाचण्यासाठी खास 'जुगाड', पोलिसही चक्रावले, VIDEO व्हायरल

हा दंड जरी जास्त असला तरी खरं म्हणजे नियमांच उल्लंघन करायचच कशाला असा सवाल वाहतूक पोलिसांनी केलाय. जर वाहन चालकाने सर्व नियमांचं पालन करत गाडी चालवली तर दंड करण्याची वेळच पोलिसांवर येणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 5 सप्टेंबर :  देशात वाहतुकीचे नवे नियम लागू झाले आहेत. (Motor Vehicles (Amendment) Act, 2019) यात दंडाची रक्कम प्रचंड वाढविण्यात आल्याने सगळेच बेशिस्त वाचन चालकांना चांगलाच दणका बसलाय. त्यामुळे सोशल मीडियावर या नियमांची चांगलीच चर्चा रंगलीय. अनेक नेटिझन्स हे नियम कठोर असल्याचं सांगत त्याची खिल्ली उडवत आहेत. एका स्कुटीचालकाने काही नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्याने त्याला पोलिसांनी 30 हजाराचा दंड केला. तेव्हा त्याने ही गाडीच 25 हजाराला विकत घेतल्याचं सांगितलं. असे अनेक खरे खोटे 'विनोद'व्हायरल झाले आहेत.

IPS अधिकारी पंकज नैन यांनी असाच एक व्हायरल व्हिडीओ आपल्या ट्विटरवरू शेअर केलाय. वाहतुक नियमांचं उल्लंघन टाळण्यासाठी लोक काय काय उचापत्या करतात असं सांगत नैन यांनी लोकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. विना हेल्मेट गाडी चालवल्यास प्रचंड मोठा दंड आकारण्याची तरतूद नव्या नयमांमध्ये आहे. सरकार विना हेल्मेट गाडी चालवू नका असं आवाहनही वारंवार करत असतं मात्र लोक ते काही ऐकत नाही.

Teachers Day 2019 : शिक्षक व्हायचंय? मग या अभ्यासक्रमांची माहिती हवीच

त्यामुळे एका चौकातून दुसरीकडे जाताना वाहतूक पोलीस असल्याने हेल्मेट न घालता जे गाड्या चालवत होते असे सगळे वाहन चालक गाडी हातात घेऊन चालत तो चौक ओलांडत पुढे जातात असा तो व्हिडीओ आहे. अशा चालकांची त्या चौकात रांगच लागल्याचं दिसतंय. हेल्मेट न चालवता गाडी चालवू नये असा नियम आहे. मात्र हेल्मेट न घालता गाडी हाहात घेत चालत जाऊ नये असा नियम नाही. त्यामुळे पोलिसही काही कारवाई करू शकत नाहीत.

INX Media Case : पी.चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचाही दणका, आज होणार अटक?

बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी हे नवे नियम करण्यात आले आहेत. भारतात प्रचंड प्रमाणात अपघातांची संख्या आहे. केवळ नियमांच पालन न करता गाडी चालविल्यामुळे 90 टक्के अपघात घडतात असं अभ्यासात आढळून आलंय. त्यामुळे हे टाळण्यासाठी आण लोकांमध्ये कायद्याविषयी धाक निर्माण होण्यासाठी हे नये नियम असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

हा दंड जरी जास्त असला तरी खरं म्हणजे नियमांच उल्लंघन करायचच कशाला असा सवाल वाहतूक पोलिसांनी केलाय. जर वाहन चालकाने सर्व नियमांचं पालन करत गाडी चालवली तर दंड करण्याची वेळच पोलिसांवर येणार नाही असंही पोलिसांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 03:49 PM IST

ताज्या बातम्या