• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कोरोना काळातही वटवाघळांची पूजा; महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये आहे प्रथा

कोरोना काळातही वटवाघळांची पूजा; महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये आहे प्रथा

आंध्रप्रदेशातील वटवाघळांची पूजा (Old tradition to worship bats in Andhra Pradesh) करण्याची अनोखी आणि आश्चर्यकारक प्रथा पाळली जाते कोरोना काळात वटवाघळांविषयी अनेक गैरसमज पसरत असताना या गावातील लोक मात्र आजही वटवाघळांना आपलं दैवत मानून आरोग्यासाठी प्रार्थना करतात.

 • Share this:
  तिरुपती, 25 ऑक्टोबर: आंध्रप्रदेशातील वटवाघळांची पूजा (Old tradition to worship bats in Andhra Pradesh) करण्याची अनोखी आणि आश्चर्यकारक प्रथा पाळली जाते कोरोना काळात वटवाघळांविषयी अनेक गैरसमज पसरत असताना या गावातील लोक मात्र आजही वटवाघळांना आपलं दैवत मानून आरोग्यासाठी प्रार्थना करतात. निसर्ग आणि आरोग्य (Health and Nature) असा दोन्ही पातळ्यांवरील विचार करून या प्रथेचा जन्म झाल्याचं सांगितलं जात आहे. आंध्रप्रदेशातील चित्तूर (Chittur district in Andhra Pradesh) जिल्ह्यात ही अनोखी परंपरा आहे. प्राचीन परंपरा वटवाघळांना दैवत मानून त्यांची पूजा करण्याची ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली, याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी गेल्या अनेक पिढ्यांपासून ती चालत आल्याचं सांगितलं जातं. एकीकडे पूर्ण जग आधुनिक होत असताना आणि वेगवेगळ्या गॅजेट्सच्या मागे धावत असताना या भागात मात्र वर्षानुवर्षं चालत आलेली ही पद्धत मनोभावे पाळली जाते. अशी होते पूजा गावकरी चिंचेच्या झाडाखाली जाऊन वटवाघळांची पूजा करतात. ही वटवाघळे रात्रीच्या वेळी जेवायला बाहेर जातात आणि दिवसा झाडांना येऊन लटकतात. वटवाघळांमुळे निसर्गाचे संरक्षण होते, असं गावकरी मानतात. या गावात चिंचेची 11 झाडं आहेत, जी वटवाघळांची आश्रयस्थानं मानली जातात. वटवाघळांना कुणी इजा केली, तर गावकरी आक्रमक होतात आणि त्याला शिक्षा देतात. त्यामुळे वटवाघळांचे संरक्षण होते आणि सहसा कुणीही त्यांच्या वाटेला जात नाही. झाडाला बांधून फटके जर कुणी वटवाघळांना इजा करताना किंवा दुखापत करताना आढळलं तर गावकरी त्याला झाडाला बांधून फटके देण्याची शिक्षा देतात. वटवाघळांमुळेच आपलं आरोग्य आणि निसर्ग यांचा समतोल टिकून असल्याचं गावकरी मानतात. महाराष्ट्रातही आहे प्रथा महाराष्ट्रातही वटवाघळांची पूजा करण्याची पद्धत आंध्रप्रदेश सीमेवरील काही गावांमध्ये पाळली जाते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही गावांमध्ये ही प्रथा पाळली जात असल्याचं सांगण्यात येतं. हे वाचा- तरुणीला करायची होती सामूहिक बलात्काराची तक्रार, घाबरलेल्या आरोपींनी केला खून कोरोना आणि वटवाघळं वटवाघळांमुळे कोरोना पसरतो, असा गैरसमज जगातील काही भागामध्ये पसरत असताना गावकरी मात्र त्यांची पूजा करून निसर्गाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. वटवाघळे ही आरोग्याचं रक्षण करणारी असून कोरोनाचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं गावकरी सांगतात.
  Published by:desk news
  First published: