मराठी बातम्या /बातम्या /देश /अवघ्या 20 दिवसांत एकाच ठिकाणी सासू आणि सुनेची एकाच प्रकारे हत्या; वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

अवघ्या 20 दिवसांत एकाच ठिकाणी सासू आणि सुनेची एकाच प्रकारे हत्या; वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

बिहारच्या पूर्णिया येथे 20 दिवसाच्या आत सासू (Mother in Law) आणि सूनेचा (Daughter in Law) एकाच जागेवर एकाच प्रकारे खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बडहरा ठाण्याच्या भटोतर गावात घडली.

पूर्णिया, 3 मे : बिहारच्या पूर्णिया येथे 20 दिवसाच्या आत सासू (Mother in Law) आणि सूनेचा (Daughter in Law) एकाच जागेवर एकाच प्रकारे खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बडहरा ठाण्याच्या भटोतर गावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना - 

भटोतर गावात 20 दिवसांपूर्वी सासूची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सोमवारी सायंकाळी सुनेचाही धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या घटनेबाबत मृत हबिया देवी यांच्या मुलाने सांगितले की, त्याची आई रात्री बारहारा येथून दुकानातून परतत होती. यादरम्यान ही घटना घडली.

भटोतर येथे पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर, रेल्वे डंपजवळ, कोणीतरी हबिया देवी यांच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्राने वार केले, त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. मृत महिलेचा मुलगा जगन्नाथ शर्माने सांगितले की, त्याच जागेवर 20 दिवसांपूर्वी त्याच्या आजीचीही याच मंदिराच्या समोर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यांनी या घटनेचा आरोप लक्ष्मण शर्मावर लावला आहे. 

हेही वाचा - क्रुरतेचा कळस! गर्भवती महिलेच्या पतीला मारहाण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार; अल्ववयीन तरुणासह तिघांना अटक

पुतण्याला अटक - 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. याआधीही त्याने आपल्याच आजीची हत्या केली होती आणि नंतर सोमवारी सायंकाळी आपल्या काकूची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे सांगितले जात आहे. बडहरा पोलीस ठाण्याचे होमगार्ड पन्नालाल यादव यांनी सांगितले की, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृताच्या पुतण्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Murder Mystery