ओखी वादळाचा जोर गुजरातकडे जाताना ओसरला

ओखी वादळाचा जोर गुजरातकडे जाताना ओसरला

या चक्रीवादळाचा फटका गुजरातला जवळपास बसणारच नाहीये. असं हवामान खात्यानं सांगितलंय.

  • Share this:

06 डिसेंबर: ओखी चक्रीवादळाचा जोर गुजरातकडे जाताना कमी झालाय. त्यामुळे या चक्रीवादळाचा फटका गुजरातला जवळपास बसणारच नाहीये.  असं हवामान खात्यानं सांगितलंय.

काल मुंबईजवळून गुजरातकडे जाताना चक्रीवादळाचा वेग कमी झाला, आणि त्यामुळे गुजरातच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सुरतमधल्या शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेत. तर अहमदाबादच्या सोळा गावांतल्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरतमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल बैठक घेतली.

पावसाचं पाणी कुठेही तुंबून राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं रुपानी यांनी सांगितलं आहे. निवडणूक आयोगानंही निवडणूक अधिकाऱ्यांना आपात्कालीन प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तर एनडीआरएफला तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ओखी चक्रीवादळामुळे सूरतमधल्या शाळा आणि काॅलजेस आज बंद ठेवण्यात येणार आहेत. तर अहमदाबादच्या सोळा गावांतल्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरतमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही वेळापूर्वीच बैठक घेतली. पावसाचं पाणी कुठेही तुंबून राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं रुपानी यांनी सांगितलं आहे. निवडणूक आयोगानंही निवडणूक अधिकाऱ्यांना आपात्कालीन प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तर एनडीआरएफला तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 08:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading