1 डिसेंबर: तामिळनाडू-केरळच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी चक्रीवादळाने आतापर्यंत नऊ बळी घेतले आहेत.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाने आता लक्षद्विप बेटाच्या दिशेने कूच केली आहे.
सध्या हे चक्रीवादळ केरळची राजधानी असलेल्या तिरूअनंतपुरमच्या 130 किमी नैऋत्य दिशेला आहे. हे वादळ सध्या आहे. या वादळाने तिरूअनंतपुरम जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. तसंच तामिळनाडूच्या कन्याकुमारी परिसरातही धुमाकूळ घातला आहे.या वादळामुळे तामिळ नाडू आणि केरळात मुसळधार पाऊस पडतो आहे. या चक्रीवादळामध्ये 90 लोकं आतापर्यंत गायब झाल्याची माहिती मिळते आहे. केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन यांनी आपत्कालीन बैठकही बोलावली आहे. या वादळाचा ताशी वेग 70ते 80 कि.मी आहे. केरळच्या कोलम शहरात या वादळामुळे मुसळधार पाऊस कोसळला.
या वादळाचा वेग येत्या काळात अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने नोंदवली आहे.
Loading...#CycloneOckhi lies at about 130 km southwest of Thiruvananthapuram, likely to move towards Lakshadweep Islands area: IMD Chennai
— ANI (@ANI) November 30, 2017
#Visuals from Shankumugham Beach in Kerala's Thiruvananthapuram district #CycloneOckhi pic.twitter.com/s2unvGbeP8
— ANI (@ANI) November 30, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा