बजेटच्या दुसऱ्याच दिवशी दरवाढीची कुऱ्हाड कोसळली, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या!

बजेटच्या दुसऱ्याच दिवशी दरवाढीची कुऱ्हाड कोसळली, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या!

आज मुंबईत पेट्रोल 78.47 रुपये झालं आहे तर काल हेच पेट्रोलचे दर 76.18 रुपये इतके होते.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं आहे. त्याच परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतही इंधानाचे दर वाढले आहेत. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर एक रुपया सेझ लावल्यानंतर पेट्रोल - डिझेलच्या किमतीत आजपासून वाढ झाली. आज मुंबईत पेट्रोल 78.47 रुपये झालं आहे तर काल हेच पेट्रोलचे दर 76.18 रुपये इतके होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अशा एका दिवसाने 2.42 रुपये प्रति लीटर वाढणार असेल तर त्याचा सामान्य मुंबईकरांना मोठा धक्का बसणार आहे.

आज पुण्यात पेट्रोलचे दर लीटर मागे 78.47 रुपये दर तर डिझेलचा दर 68.72 रुपये इतका आहे. बजेमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये सेस लावण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम आता इंधानाच्या किंमतीवर दिसणार आहे. शुक्रवारी सेस लावण्यात आला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 2छ30 रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी सादर केलेल्या 2019-20च्या बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 1 रुपया सेस आणि 1 रुपया एक्साइज ड्यूटी लावण्यात येणार असल्याची घोषणा केली. देशाची राजधानी दिल्लीविषयी बोलायचं झालं तर शुक्रवारी बजेट सादर होण्याआधी पेट्रोल 70.51 रुपये प्रति लीटर होतं तर डिझेल 64.33 रुपये प्रति लीटर इतकं होतं. पण आता पेट्रोल 72.96 आणि डिझेल 66.69 रुपये प्रति लीटर झालं आहे.

सोन्याचे दर वाढले

दरम्यान, सोन्याच्या दरात देखील वाढ होणार आहे. सोन्यासह इतर मौल्यवान रत्नांवरची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. सोन्यावर सरकारनं 12 टक्के कस्टम ड्युटी केली आहे. त्यामुळे सोन्याचा किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.

Income Tax भरण्यासाठी आता PAN Cardची गरज नाही

Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता. होय, आता PAN Card नसल्यास Income Tax भरणं शक्य होणार आहे. Income Tax भरण्यासाठी आता PAN Card ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्याचे देखील आभार मानले.

VIDEO: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 6, 2019, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading