हेच का अच्छे दिन?, तेल कंपन्यांनी ५२ हजार कोटी कमावले, लोकांनी गमावले

हेच का अच्छे दिन?, तेल कंपन्यांनी ५२ हजार कोटी कमावले, लोकांनी गमावले

देशातील प्रमुख तेलकंपन्यांनी तब्बल 52 हजार कोटी नफा कमावल्याची माहिती उघड झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : गेल्या महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना पेट्रोल डिझेलवरील करांमध्ये कपात करता येणार नसल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं पण असताना दुसरीकडे देशातील प्रमुख तेलकंपन्यांनी तब्बल 52 हजार कोटी नफा कमावल्याची माहिती उघड झाली आहे.

एवढच नाही तर या कंपन्यांनी भागधारक असलेल्या सरकारला हजारो कोटींचा लाभांशही दिला आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांचे हाल पण कंपन्या मालामाल असं म्हणायला हरकत नाही.

सजग नागरिक मंचचे विवेल वेलणकर यांनी ऑइल कंपन्यांची नफेखोरी उजेडात आणली आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांचा विचार कुठेच होत नाही हेच उघड झालं आहे.

वेलणकर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार,

हिंदुस्थान पेट्रोलियमला एकूण - 9201 कोटी नफा

भारत पेट्रोलियमला - 11,198 कोटी नफा

इंडियन ऑइलला - 32,564 कोटी रुपये नफा झाला आहे.

दरम्यान, या कंपन्यांनी सरकारला अनुक्रमे दिलेला लाभांश आहे

- 2589.10 कोटी

- 4,128.60 कोटी

- 20,393.10 कोटी

नफ्यातील एवढी रक्कम कर आणि लाभांशापोटी दिल्यावरही या 3 कंपन्यांची गंगाजळी आहे 1 लाख 55 हजार 301 कोटी रुपये. ही माहिती कंपन्यांनी त्यांच्या संकेत स्थळावर दिली आहे.

या सगळ्या कोटींच्या आकड्यांतून मात्र सामान्य माणसाला काडीचाही फायदा नाही आणि अच्छे दिन दूरच आहेत अशी टीका वेलणकर यांनी केली आहे.

First published: June 19, 2018, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading