पाकिस्तानला मोठा धक्का; OICचं भारताला आमंत्रण

ओआयसीनं भारताला आमंत्रित केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2019 03:36 PM IST

पाकिस्तानला मोठा धक्का; OICचं भारताला आमंत्रण

दिल्ली, 28 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला बसत असलेल्या धक्क्यांची मालिका काही थांबताना दिसत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेमध्ये अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटननं जैश ए मोहम्मद या संघटनेविरोधात प्रस्ताव मांडला. त्यानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ओआयसी ( OIC ) अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशननं भारताला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं आहे. OICचं आमंत्रण पाकिस्तानला झोंबलं असून त्यांनी OICमध्ये सहभागी न होण्याची धमकी दिली. पण, पाकिस्तानच्या या धमकीचा ओआयसीवर काहीही परिणाम झालेला नाही.

विशेष बाब 1 ते 2 मार्च दरम्यान अबुधाबी येथे होणाऱ्या OICच्या बैठकीमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज भाषण करणार आहेत. जवळपास तासभर स्वराज OICला संबोधित करतील. OICचं आमंत्रण आल्यानं हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. OICमध्ये जवळपास 57 इस्लामिक देश सदस्य आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चाबांधणी करायला सुरूवात केली. त्याचे परिणाम देखील आता दिसू लागले आहेत.


भारताच्या दबावाचा परिणाम, 'जैश ए मोहम्मद'विरोधात पाकची कारवाई


Loading...

भारताने केलेला हल्ला योग्यच

भारत- पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पियोशी चर्चा केली. डोवाल आणि पॉम्पियो यांची मध्यरात्री फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हल्ला योग्य असल्याचं अमेरिकेचं म्हणणं असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली. अमेरिकेकडून मिळालेल्या या समर्थनादरम्यान आज गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली. बैठकीत सीमेवर चाललेल्या हालचालींवर चर्चा करण्यात आली.


40 जवान शहीद

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं भारतीय सैन्यावर आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानसह दहशतवादी संघटनांविरोधात देखील कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.


सीमेवर तणाव; सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...