मराठी बातम्या /बातम्या /देश /

MIM चे ट्विटर अकाऊंट हॅक, लावला एलॉन मस्क यांचा फोटो, हॅकर्सच्या हेतूविषयी जोरदार चर्चा

MIM चे ट्विटर अकाऊंट हॅक, लावला एलॉन मस्क यांचा फोटो, हॅकर्सच्या हेतूविषयी जोरदार चर्चा

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन अर्थात MIM पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक (Official twitter handle hacked) झाल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.

  • Published by:  desk news

हैदराबाद, 18 जुलै : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन अर्थात MIM पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक (Official twitter handle hacked) झाल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला हे अकाऊंट हॅक झाल्याचं लक्षात आलं. या अकाऊंटवरील पक्षाचं नाव बदलून ते एलॉन मस्क (Elon Musk) असं करण्यात आलं, तर प्रोफाईल पिक्चरदेखील (Profile Picture) बदलून एलॉन मस्क यांचा फोटो लावण्यात आला. असादुद्दिन ओवेसींऐवजी (Owaisi) एलॉन मस्क यांचा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला.

यापूर्वीही अकाऊंट झालं होतं हॅक

एमआयएम पक्षाचं अकाऊंट यापूर्वीदेखील हॅक झालं होतं. नऊ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पक्षाचं ट्विटर हँडल हॅक करून हॅकर्सनी काही काळ हे हँडल ऑपरेट करणाऱ्यांना धडकी भरवली होती. मात्र काही वेळानंतर हॅकर्सनी आपला दावा सोडून दिला आणि हे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात पक्षाला यश आलं होतं. आता पुन्हा हे अकाऊंट हॅक करण्यात आलं आणि एलॉन मस्क यांचा फोटो प्रोफाईलला लावण्यात आला.

एलॉन मस्क यांचा फोटो कशासाठी?

वास्तविक, हॅकर्सना या कृतीतून नेमका काय संदेश द्यायचा होता, याची जोरदार चर्चा सुरू आहे. एलॉन मस्क हे टेस्ला कंपनीचे प्रमुख असून स्पेसएक्स नावाचीही त्यांची कंपनी आहे. श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावण्याचा बहुमान त्यांच्या नावे जमा होता. आता ते दुसऱ्या स्थानी आहेत. मात्र त्यांच्या आणि एमआयएम पक्षाचा एकमेकांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना त्यांचा फोटो ट्विटरच्या प्रोफाईलला का लावण्यात आला, असा प्रश्न सर्वांनाच पडला.

हे वाचा - मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बांगलादेशी नागरिकाचा समावेश! काँग्रेसचा गंभीर आरोप

एकही पोस्ट नाही

अकाऊंट हॅक झालं असलं, तरी त्यावरून कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट हॅकर्सनी केली नाही. केवळ हँडलचं नाव बदलणं आणि फोटो बदलणं, याशिवाय हॅकर्सनी या अकाऊंटचं कुठलंही नुकसान केलं नाही. त्यामुळे नेमकं हॅकर्सना काय साधायचं होतं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयएमच्या या ट्विटर हँडलचे 6.78 लाख फॉलोअर्स आहेत.

First published:

Tags: Elon musk, MIM, Twitter account, ओवेसी MIM