मराठी बातम्या /बातम्या /देश /

Omicron व्हेरिएंटचं WhatsApp स्टेट्स ठेवणं पडलं महागात

Omicron व्हेरिएंटचं WhatsApp स्टेट्स ठेवणं पडलं महागात

Omicron cases in India: भारतात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. दिल्लीत ओमायक्रॉन बाधित आढळून आल्याने आता भारतातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

Omicron cases in India: भारतात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. दिल्लीत ओमायक्रॉन बाधित आढळून आल्याने आता भारतातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

Omicron cases in India: भारतात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. दिल्लीत ओमायक्रॉन बाधित आढळून आल्याने आता भारतातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

    जोधपूर, 5 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) चिंतेचे वातावरण आहे. देशात आतापर्यंत पाच जणांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे. त्याच दरम्यान आता जोधपूर येथून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. जोधपूर एम्समधील ऑफिस बॉयने आपल्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअप स्टेटस ओमायक्रॉन व्हेरिएंटचं (Omicron variant whatsapp status) ठेवलं. त्याने हे ठेवलेलं स्टेटस महागात पडलं आहे. ...म्हणून पोलिसांनी केली कारवाई ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. जोधपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बासनी पोलिसांनी त्याच्या विरोधात संक्रमण कायदा अद्यादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सुनील असे असून तो जोधूपर एम्स रुग्णालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतो. सुनील एम्स रुग्णालयात कार्यरत आहे. त्यामुळे त्याने ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस अनेकांनी व्हायरल करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. तसेच प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कोरोना कंट्रोल रूममधील फोन खणखणू लागले. नागरिकांकडून या संदर्भात विचारणा होऊ लागली. वाचा : टांझानियावरुन दिल्लीत परतलेल्या प्रवाशाला Omicron ची लागण शहरात भीतीचे वातावरण डेप्युटी सीएमएचओ प्रीतम सिंह यांनी सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका पोस्टची माहिती पोलीस आयुक्तांना पाठवली. तसेच ओमायक्रॉन संदर्भात काही जण अफवा पसरवत असल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस आयुक्त जोस मोहन यांच्या निर्देशानुसार बसनी पोलिसांनी ऑफिस बॉय सुनीलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. भारतात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. एकूण पाच जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी कर्नाटकमधील दोघांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. तर गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कर्नाटक - 2 जणांना ओमायक्रॉन संसर्ग गुजरात - 1 व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग महाराष्ट्र - डोंबिवलीतील एका व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग दिल्ली - 1 व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग वाचा : साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लाट आहे की नाही हे स्प्ष्ट होण्यासाठी अद्याप सहा ते आठ आठवडे लागू शकतात. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, ओडिसा आणि मिझारोम या राज्यांना कोविड -19 चा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी असलेल्या योग्य पद्धतीचा अवलंब करण्याबाबत एक पत्र लिहिले आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Rajasthan, Whatsaap

    पुढील बातम्या