Home /News /national /

केवळ हार घालणं म्हणजे लग्न नव्हे, 7 फेरे आणि विधीही आवश्यक; हायकोर्टाचं मत

केवळ हार घालणं म्हणजे लग्न नव्हे, 7 फेरे आणि विधीही आवश्यक; हायकोर्टाचं मत

केवळ एकमेकांच्या गळ्यात हार घातले (garlands) म्हणजे लग्न (Marriage) होत नाही, त्यासाठी 7 फेरे (7 rounds) आणि धार्मिक विधीदेखील (Religious rituals) गरजेचे असल्याचं मत हायकोर्टानं (High Court) व्यक्त केलं आहे.

    ग्वालियर, 15 सप्टेंबर : केवळ एकमेकांच्या गळ्यात हार घातले (garlands) म्हणजे लग्न (Marriage) होत नाही, त्यासाठी 7 फेरे (7 rounds) आणि धार्मिक विधीदेखील (Religious rituals) गरजेचे असल्याचं मत हायकोर्टानं (High Court) व्यक्त केलं आहे. आर्य समाजमंदिरात लग्न करून सुरक्षेची मागणी करणाऱ्या जोडप्याची याचिका फेटाळताना न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे. आर्य समाज मंदिरात लग्न करून सुरक्षेची मागणी करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ एकमेकांना हार घातले म्हणजे लग्न होत नाही, असं म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत 7 फेरे घेता आणि इतर सर्व धार्मिक रितीरिवाज पार पाडता, तेव्हाच ते लग्न ठरतं, असंही कोर्टानं म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? ग्वालियरजवळच्या मुरैनामधील एक 23 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांच्या तरुणीनं प्रेमविवाह केला. त्यांनी आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केलं आणि लग्नाचं सर्टिफिकेटदेखील आणलं. हे सर्टिफिकेट कोर्टात सादर करत आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी केली. आपल्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असून ते आपल्याविरोधात वाट्टेल त्या तक्रारी दाखल करत असल्याचं त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे आपल्याला आपला संसार पुढे नेण्यासाठी अटकेपासून संरक्षण देण्यात यावं आणि पोलीस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी या जोडप्यानं केली होती. सरकारी वकिलांचा युक्तीवाद या जोडप्याला नेमकी कुणी धमकी दिली, हेदेखील सांगता येत नसल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं. या जोडप्याने कुणाही विरोधात तक्रार दाखल केली नसून पोलीस स्टेशनकडेही सुरक्षेची मागणी केलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. हे वाचा - भीषण अपघातानंतर बसने घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, LIVE VIDEO आला समोर न्यायालयाने याचिका फेटाळली जिवाला धोका आहे, असे वाटत असेल, तर प्रत्येक नागरिकाने सर्वप्रथम पोलिसांकडून संरक्षण मागणे गरजेचं आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे. पोलिसांकडे संरक्षण न मागता थेट उच्च न्यायालयाकडे त्याची मागणी करणे चुकीचं असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. या जोडप्याने अगोदर पोलिसांत जावं, तिथे काही अडचण आली तरच कोर्टाचे दरवाजे ठोठावावेत, असा सल्लाही कोर्टाने या जोडप्याला दिला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: High Court, Marriage

    पुढील बातम्या