Home /News /national /

एका बर्थ डे पार्टीनं अख्खं शहर हादरलं, कोरोना पॉझिटिव्ह महिलेनं शेजाऱ्यांना बोलवलं घरी आणि...

एका बर्थ डे पार्टीनं अख्खं शहर हादरलं, कोरोना पॉझिटिव्ह महिलेनं शेजाऱ्यांना बोलवलं घरी आणि...

एका बर्थ डे (Birthday Party) आणि वेडिंग पार्टीमुळं 17 जणं कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

    भुवनेश्वर, 22 जून : कोरोनाच्या काळात लोकांचा विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्वच स्थरातून केले जात असतानाही अद्यापही लोकं याकडे गांभीर्यानं पाहत नाही आहेत. असाच प्रकार ओडिशातील झारसुगुडा (Jharsuguda) जिल्ह्यात आढळून आला. येथे एका बर्थ डे (Birthday Party) आणि वेडिंग पार्टीमुळं 17 जणं कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पार्टी नियमांचे उल्लंघन करून आयोजित करण्यात आला होता. परिणामी 17 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्याचे डीएम सरोज कुमार यांनी दिलेल्या माहितीत, 17 लोकांनी एकाच आठवड्यात दोन पार्टी केल्या. यात 17 जण सामिल झाले होते. आता या सगळ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 14 जूनला गुरगांवहून ओडिशा पोहचलं कुटुंब डीएम यांनी सांगितले की, 14 जून रोजी गुरगांवहून आपल्या पती आणि मुलासह ओडिशाला आलेल्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या महिलेने होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे सांगितले. मात्र तिने या नियमांचे उल्लंघण केले. हे कुटुंब जिल्ह्यातील ब्रजराजानगरमध्ये राहताच जे एक कंटेन्टमेंट झोन आहे. कुटुंबास कोरोनाशी संबंधित सर्व सूचना देण्यात आल्या. 14 दिवस घर सोडू नये, अशी कडक सूचना करण्यात आली होती. मात्र सर्व नियम मोडत त्या पार्टीमध्ये सामिल झाल्या. वाचा-लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या कंपन्यांना सरकारचा मोठा दिलासा,घेतला महत्त्वाचा निर्णय मुलाची बर्थ डे पार्टी केली आयोजित या महिलेने सर्व नियम मोडले आणि मुलाच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली ज्यात शेजार्‍यांना आमंत्रित केले गेले. यानंतर या महिलेने तिच्या शेजारच्या वेडिंग पार्टीमध्ये हजेरी लावली. यानंतर, जेव्हा लोकांची तब्येत बिघडली तेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दरम्यान सर्व माहिती समोर आली आहे. कुटुंबाविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की या कुटुंबाने त्यांच्या आजारपणाबद्दल शेजार्‍यांना माहितीदेखील दिली नाही. वाचा-देशातील 55% रुग्ण झाले निरोगी, 24 तासांत नवीन रुग्णांचा आकडा 15 हजारांच्या घरात संपूर्ण परिसर हादरला या घटनेने खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे डीएम सांगतात की जर कुटूंबाने अशी गडबड केली नसती तर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 8 कोरोना प्रकरणे समोर आले होती. आम्ही बर्‍याच अंशी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते. वाचा-कोरोनाच्या साथीत पावसाळ्यात इतर आजारांचाही धोका; कसा कराल स्वत:चा बचाव संपादन-प्रियांका गावडे.
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Corona virus in india

    पुढील बातम्या