Home /News /national /

तो सेल्फी ठरला शेवटचा, 13 वर्षाचा मुलगा रेल्वेच्या टपावर चढून क्लिक करायला गेला आणि...

तो सेल्फी ठरला शेवटचा, 13 वर्षाचा मुलगा रेल्वेच्या टपावर चढून क्लिक करायला गेला आणि...

Selfie काढण्याच्या प्रयत्नांमध्ये अपघात होऊन जीव गमवावा लागण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत. तरीही धोकादायक पद्धतीनं सेल्फी घेण्याचं वेड काही कमी होत नाही.

    गजपती, 17 डिसेंबर: मोबाइलमधून आपले वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पोझ देत सेल्फी (Selfie) काढणं आणि फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर पोस्ट करणं ही सध्याची क्रेझ आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांमध्येही सेल्फीचं वेड दिसून येतं. अनेकदा सेल्फी घेण्यासाठी अवघड, धोकादायक जागांची देखील निवड केली जाते. उंच कडे, पूल, धबधबे, रेल्वेचे छत यासह धावत्या रेल्वेच्या दारात उभे राहूनही सेल्फी काढला जातो. अशा प्रयत्नांमध्ये अपघात होऊन जीव गमवावा लागण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत. तरीही धोकादायक पद्धतीनं सेल्फी घेण्याचं वेड काही कमी होत नाही. नुकत्याच ओडिशामध्ये घडलेल्या या घटनेनं सेल्फीच्या जीवघेण्या वेडाचा वाढता धोका अधोरेखित केला आहे. ओडिशामध्ये (Odisha)अवघ्या 13 वर्षांच्या मुलाचा जीव गेला असून, दोन मुलं जखमी झाली आहेत. ओडिशातील गजपती जिल्ह्यात बुधवारी ही भयंकर घटना घडली. परलाखेमुंडी रेल्वे स्थानकावर रेल्वेचे काही डबे (Railway Coach) कोविड आयसोलेशन सेंटर (Covid Isolation Centre) म्हणून वापरण्यात येत आहेत. अपघातात मरण पावलेला पी. सूर्या हा 13 वर्षांचा मुलगा आपल्या दोन समवयस्क मित्रांसह या डब्याच्या छतावर सेल्फी काढण्यासाठी चढला. सेल्फी घेत असताना त्यांचा वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या तारेशी संपर्क आला. या तारेतून वीजपुरवठा सुरू असल्यानं पी. सूर्याचा विजेच्या धक्क्यानं जळून जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. यानंतर रेल्वेच्या डब्याच्या छतालाही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहचून ही आग विझवली. या मुलाने मात्र जीव गमावला. पी. सूर्याच्या मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जाऊ द्या ना मॅडम, डायरेक्ट महिला वाहतूक पोलिसांच्या खिश्यात पैसे जमा, LIVE VIDEO कोविड 19 चे आयसोलेशन सेंटर म्हणून वापरण्यात येणारे रेल्वेचे हे डबे या स्थानकावर मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटर लांब दुसऱ्या क्रमांकाच्या फलाटावर उभे आहेत. तरीही ही मुलं इथं कशी पोहोचली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील सुरक्षिततेचाही मुद्दा पुढं आला आहे. याही पेक्षा इतक्या लहान वयाच्या मुलांमध्ये पसरणारं हे 'सेल्फी वेड' पुढच्या धोक्याची सूचना देत असून,त्यावर वेळीच सावध होऊन उपाय करणं महत्त्वाचं आहे. खांद्यावर हात टाकून चालले होते 2 मित्र, अंगावर पिलरचा भाग कोसळला अन्... सेल्फीच्या या जीवघेण्या वेडामुळं आता सेल्फीला ‘किल्फी’ (Killfie) म्हटलं जाऊ लागलं आहे. नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं (All India Institute of Medical Sciences ) केलेल्या एका अभ्यासात ऑक्टोबर 2011 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान सेल्फी घेताना 259 जणांनी जीव गमावल्याचं नमूद केलं आहे. तर गेल्या वर्षी हा आकडा 93 होता.
    First published:

    पुढील बातम्या