कोरोना रुग्ण समजून बायकोला दिला त्रास, पोलिसांनी तुरूंगात असा केला नवऱ्याचा 'उपचार'

कोरोना रुग्ण समजून बायकोला दिला त्रास, पोलिसांनी तुरूंगात असा केला नवऱ्याचा 'उपचार'

कोरोना असल्याच्या संशयामुळे नवऱ्याने छळ केल्याचा आरोप नवविवाहित महिलेने केला आहे.

  • Share this:

ओडिशा, 15 मार्च : कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही 100हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकीकडे सरकार कठोर पाऊले उचलत असताना दुसरीकडे याच कोरोनामुळे गुन्हेगारीही वाढत आहे. असाच एक प्रकार ओडिशात घडला. एका नवविवाहित महिलेने पतीसह सासरच्यांवर मारहाण आणि अत्याचाराचे आरोप केले आहे. याचे कारण आहे कोरोना. तिला कोरोना असल्याच्या संशयामुळे नवऱ्याने तिचा छळ केला होता.

हा प्रकार ओडिशाच्या नबरनपूर जिल्ह्यात घडला. पोलिसात तक्रार केलेल्या महिलेचा विवाह 2 मार्च रोजी जयंत कुमार नावाच्या युवकाशी झाला होता. मात्र आता तिला कोरोना असल्याच्या संशयावरून तिला त्रास देण्यात येत आहे.

वाचा-गोमूत्र पिऊन कोरोनाव्हायरसवर उपचार, Video पाहून रिचा चड्ढालाही बसला शॉक

एवढेच नाही तर या लग्नासाठी महिलेच्या कुटुंबीयांनी रोख, दागिने, दुचाकी आणि मौल्यवान वस्तू असा अडीच लाखांचा हुंडाही दिला होता. मात्र लग्नानंतर पाच लाखांच्या हुंड्याची मागणी करत तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

वाचा-कोरोना’मुळे सुहाना खान घरातच बंदिस्त, बाहेर पडता येत नसल्यामुळे कोसळलं रडू

काही दिवसांपासून या महिलेला सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे पतीने कोरोना झाल्याचे सांगत पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केला. तिला जमिनीवर झोपण्यासही भाग पाडले. दरम्यान, नवरा व सासरच्यांच्या छळाला कंटाळून अखेर नवविवाहितेने उमरकोट पोलिसात तक्रार नोंदवली.

वाचा-दारूची पार्टी पडली महागात, 11 मित्रांना झाला 'कोरोना'

याबाबत पोलिस अधिक्षक नितीन कुसाळकर यांनी, 'हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी महिलेच्या पतीवर आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तक्रारीत महिलेवर कोरोना विषाणूचा संशयही जोडला गेला. तर, पती जयंत कुमार आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे', असे सांगितले. तसेच, जयंत कुमारवर घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याअंतर्गत कुमार कुटुंबावर 498 (ए), 323, 506 आणि 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: March 15, 2020, 4:40 PM IST

ताज्या बातम्या