Home /News /national /

बायकोच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला पती, 7 वर्षांनी ‘या’ रुपात समोर आली पत्नी

बायकोच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला पती, 7 वर्षांनी ‘या’ रुपात समोर आली पत्नी

बायकोची हत्या केली म्हणून तुरुंगात होता पती, बाहेर आल्यानंतर पत्नीलाच काढलं शोधून.

    ओडिसा, 04 मार्च : प्रेमात लोक चंद्र, तारे तोडण्याच्या भाषा करतात. मात्र हेच प्रेम कधी कधी एकमेकांचा द्वेष करण्यासाठी भाग पाडतं. ओडिसामध्ये सात वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. अनैतिक संबंध असल्याच्या संशयामुळं पतीवर पत्नीचा खुन केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला शिक्षाही झाली. मात्र आता पोलिसांना तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला. तपासादरम्यान चक्क पोलिसांना आरोपीची पत्नीच तिच्या प्रियकरासोबत सापडली. त्यानंतर हे प्रकरण बनावट असल्याचे उघडकीस आले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभय सुतारने 7 फेब्रुवारी 2013 रोजी इतिश्री मोहानाशी लग्न केले. अभय मूळचा केंद्रापाड्यातील चुलिया गावचा रहिवाशी होता. इतिश्रीला अभयशी लग्न करण्यासाठी घरच्यांनी भाग पाडले असल्याची माहिती याआधी पोलिसांना मिळाली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनतर इतिश्री बेपत्ता झाली. अभयनं पोलिसांत तक्रार केली, त्यांनी 14 मे 2013मध्ये इतिश्रीचे वडिल प्रल्हाद मोहराना यांनी अभयवरच आरोप केले. प्रल्हादाने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की अभयने आपल्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह फेकून दिला. वाचा-Kiss करू नका, कोरोनाच्या भीतीने नागरिकांना दिलेत हे आदेश पोलिसांनी ही फिर्याद नोंदविल्यानंतर अभयला अटक केली. एका महिन्यानंतर अभय जामिनावर सुटला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा शोध सुरू केला, कारण पत्नी पळून गेली असावी असा संशय त्याला होता. अभयने आपल्या पत्नीबद्दल माहिती गोळा केली आणि तिला पिपली येथे प्रियकरसमवेत राहत असल्याचे समजले. वाचा-सई ताम्हणकरच्या पायाला दुखापत, त्याच अवस्थेत करते आहे सिनेमाचं शूटिंग इतिश्रीची माहिती मिळाल्यानंतर अभय पोलिसांसोबत तिच्या राहत्या ठिकणी पोहचला. त्यानंतर पोलिसांनी इतिश्रीला तिच्या प्रियकरासह अटक केली. राजीव लोचन मोहराना असे या महिलेच्या प्रियकराचे नाव आहे. वाचा-खरं की खोटं? रिझर्व्ह बँकेनं जारी केली एक हजाराची नवी नोट, फोटो VIRAL पाटकुरा येथील वरिष्ठ अधिकारी सुजित प्रधान यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, "दोघांनाही सोमवारी कोर्टात हजर केले होते. इतिश्रीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की लग्नाआधीच तिचा राजीवसोबत प्रेमसंबंध होता. तिच्या आई-वडिलांनी तिला अभयशी जबरदस्तीने भाग पाडले”. इतिश्री आणि राजीवआधी गुजरातमध्ये गेले तेथे जवळपास सात वर्षे राहिले. त्यानंतर पुन्हा ओडिसामध्ये आले, तेव्हा त्यांचे भांडे फुटले. पोलिसांनी इतिश्री आणि राजीव यांना ताब्यात घेतले असून अभयने अब्रु नुकसानीचा दावा या दोघांवर ठोकला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Extra marital affair

    पुढील बातम्या