ओडिशा, 29 डिसेंबर : ओडिशामध्ये राजकारणाला हादरावून सोडणारी घटना घडली आहे. झारसुगुडा जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याने आरोग्य मंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहे. या हल्ल्यात नबा दास जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. एका कार्यक्रमात जात असताना पोलीस इन्स्पेक्टने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबा दास हे ब्रजराजनगर येथील गांधी चौक इथं एका कार्यक्रमामध्ये चालले होते. त्याचवेळी गोपालचंद्र दास या पोलीस इंस्पेक्टरने गोळी झाडली. नबा दास यांच्या छातीत गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने झारसुगुड़ा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
(नांदेडनंतर आणखी एक ऑनर किलिंग; बापाने मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन्...)
नबा दास हे ब्रजरानगर येथील बीजू जनता दल (बीजद) च्या कार्यालयचे उद्घाटन करणार होते. वाटेमध्ये गांधी चौक आला. त्यावेळी त्यांनी कारमधून उतरून पायीचे पक्षाच्या कार्यालयाकडे जाणार होते. त्याच वेळी गोपालचंद्र दास या पोलीस इंन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या. नबा दास यांना आता झारसुगुड़ा विमानतळावर आणण्यात येणार आहे. तिथून त्यांना भुवनेश्वरला नेण्यात येईल.
पण, राज्याच्या आरोग्य मंत्र्यावर भर चौकात गोळीबाराची घटना कशी घडली. सुरक्षा व्यवस्थेत एवढी मोठी चूक कशी झाली. याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
(स्फोटाचा आवाज, आकाशातून आगीचा वर्षाव, पॅराशूट.. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं अपघातावेळी काय झालं?)
ओडिसा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळाची पाहणी केली आहे. ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची गांधी चौकाच्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी लागली होती. त्याने आपल्या सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून मंत्री नबा दास यांच्यावर गोळी झाडली. त्याने हे कृत्य का केले, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. नबा दास यांना तातडीने एअर लिफ्ट करून भुवनेश्वरला पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Odisha