Home /News /national /

गृहप्रवेश न करता नवरीने सासरच्या दारातच मांडले ठिय्या आंदोलन, काय आहे कारण?

गृहप्रवेश न करता नवरीने सासरच्या दारातच मांडले ठिय्या आंदोलन, काय आहे कारण?

bride

bride

ओडिशाच्या बरहमपूरमध्ये एक तरुणी (bride) आपल्या नवरदेवाच्या वरातीची वाट पाहत होती. मात्र ही वरात आलीच नाही. त्यामुळे या तरुणीने आपल्या आईसोबत नवरदेवाचं घर गाठलं.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर:  हिंदू पद्धतीच्या लग्नामध्ये वरातीला विशेष स्थान आहे. लग्नाच्या ठिकाणी नवरदेव घोड्यावर बसून, संपूर्ण वरात घेऊन जातो, आणि नव्या नवरीला आपल्या घरी घेऊन येतो. मात्र, ही वरातच आली नाही तर? ओडिशाच्या बरहमपूरमध्ये (Odisha Bride dharna) असाच एक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एक तरुणी आपल्या नवरदेवाच्या वरातीची वाट पाहत होती. मात्र ही वरात आलीच नाही. त्यामुळे या तरुणीने आपल्या आईसोबत नवरदेवाचं घर गाठलं. सध्या या दोघीही नवरदेवाच्या घरासमोर ठिय्या (Odisha bride protest) मांडून बसल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनीही काही दिवसांपूर्वी कोर्टात लग्न केलं होतं. दोघांच्याही कुटुंबीयांनी काही दिवसांनी हिंदू पद्धतीने लग्न (Hindu marriage rituals) करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लग्नाच्या दिवशी ही तरुणी आपल्या घरी जाऊन वरात येण्याची वाट पाहत होती. मात्र, मुहूर्त ओलांडून कित्येक तास झाल्यानंतरही वरात (Odisha baraat matter) आलीच नाही. एवढंच नाही, तर वधूकडील लोकांनी नवरदेवाला कित्येक फोन आणि मेसेजेसही केले, मात्र त्यावरही काहीच उत्तर मिळालं नाही. यामुळे नाराज झालेल्या वधूने लग्नाच्या पोषाखातच (Odisha bride viral) वराचं घर गाठलं. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, सुमीत आणि या मुलीचे 7 सप्टेंबर 2020 रोजी कोर्टात लग्न झाले होते. यानंतर ती सासरी गेली होती. “माझ्या सासरचे लोक पहिल्या दिवसापासूनच माझा छळ करत होते. सुरुवातीला सुमितने माझी बाजू घेतली होती, मात्र काही दिवसांनी तोदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत सामील झाला. मला खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. यानंतर मी पोलिसांकडे तक्रारही नोंदवली होती. मात्र, नंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तडजोड करण्यात आली. यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून 22 नोव्हेंबरला हिंदू पद्धतीने पुन्हा लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र लग्नाची वरात आलीच नाही. त्यामुळे मला आईसोबत इकडे यावं लागलं.” असं या तरुणीनी सांगितलं. या ठिकाणी पोहोचल्यानंतर वधू आणि तिच्या आईने वराच्या घरासमोर ठिय्या (Odisha bride and mother protest) मांडला. यावेळी त्यांनी धरणे आंदोलनही सुरू केलं. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या तरुणीने पोलिसांवरही आपला राग काढला. पोलिसांनी सुमितच्या कुटुंबीयांकडून लाच घेतल्याच्या आरोपही तिने यावेळी केला. दरम्यान, “याआधीही एका प्रकरणात तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तरुणीने सुमित आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आला असून, कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे कारवाई करण्यात येईल.” अशी माहिती बरहमपुरचे एसपी पिनाक मिश्रा यांनी दिली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bride, Bridegroom, Odisha

    पुढील बातम्या