Home /News /national /

Cyclone Alert : येत्या 48 तासात ओडिशाच्या किनारपट्टीवर घोंगावणार चक्रीवादळ, NDRFचा इशारा

Cyclone Alert : येत्या 48 तासात ओडिशाच्या किनारपट्टीवर घोंगावणार चक्रीवादळ, NDRFचा इशारा

भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, कमी दाबाचं क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. परिणामी, बंगालच्या पूर्व-मध्यभागी चक्रीवादळ निर्माण होईल.

    भुवनेश्वर/कोलकाता, 6 मे : दक्षिण अंदमानच्या दक्षिणेकडे समुद्रावर शुक्रवारी कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता (Cyclone Alert) आहे. हे वादळ पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर (Odisha Coast) पोहोचण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर ओडिशात इशारा जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) पडणार आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, कमी दाबाचं क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. परिणामी, बंगालच्या पूर्व-मध्यभागी चक्रीवादळ निर्माण होईल. ते म्हणाले की 10 मेपर्यंत किनारपट्टीवर पोहोचणं अपेक्षित आहे. महापात्रा म्हणाले की, ते प्रथम कुठे येईल, याबाबत अद्याप कोणतंही भाकीत केलेलं नाही. (महाराष्ट्रातील आणखी एक भाजप आमदारावर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता) महापात्रा म्हणाले, 'जेव्हा वादळ किनार्‍याजवळ पोहोचेल, तेव्हा ते कुठे धडकेल हे सांगता येईल. 9 मे पासून समुद्राची स्थिती बिघडू शकते, त्यामुळे मच्छीमारांनी घराबाहेर पडू नये. अंदाजानुसार, चक्रीवादळाचा वेग समुद्रात 80-90 किमी प्रतितास असेल. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता, हवामान कार्यालयाने पुढील आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या परिसरात पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन सेवा सतर्क ओडिशाचे विशेष मदत आयुक्त (एसआरसी) पीके जेना यांनी सांगितलं की, एनडीआरएफच्या 17 टीम, ओडीआरएएफच्या 20 टीम आणि अग्निशमन सेवेच्या 175 टीमना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अग्निशमन सेवा महासंचालक एसके उपाध्याय यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Andhra pradesh, Cyclone, Odisha

    पुढील बातम्या