लोकसभा 2019: मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या 95 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लोकसभा 2019: मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या 95 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

ओडीसामधील गंजम येथे मतदानासाठी रांगेत उभे असणाऱ्या एका 95 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

भुवनेश्वर, 17 एप्रिल: ओडीसामधील गंजम येथे मतदानासाठी रांगेत उभे असणाऱ्या एका 95 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 12 राज्यातील 95 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. ओडिसातील काही मतदान केंद्रांवर इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला उशिर झाला. राज्यातील अस्का लोकसभा मतदारसंघातील सनाखेमंडी येथील कंसमारी मतदान केंद्रावर 95 वर्षाच्या वृद्धाचा चक्कर आल्याने मृत्यू झाला.

कंसमारी येथील रहिवाशी असलेल्या नटबारा बेहेरा मतदानासाठी कुटुंबासोबत मतदान केंद्रावर पोहचले होते. मोठी रांग असल्याने त्यांना बराच वेळ उभा रहावं लागलं. त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तिथेच कोसळले.त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, पाहा व्हिडिओ

First Published: Apr 18, 2019 03:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading