मोदींचा विविधतेतल्या एकतेवर विश्वास-बराक ओबामा

मोदींचा विविधतेतल्या एकतेवर विश्वास-बराक ओबामा

करण थापर यांनी ओबामांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी मनमोकळेपणानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

  • Share this:

01 डिसेंबर : ' पंतप्रधान मोदींचा विविधतेतल्या एकतेवर विश्वास आहे. ते सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ इच्छितात.' हे उद्गार आहेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांचे. 'एचटी समीट 2017'मध्ये ते बोलत होते. सीएनएन न्यूज18 नेटवर्क या परिषदेचे मीडिया पार्टनर आहे. करण थापर यांनी ओबामांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी मनमोकळेपणानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

ओबामा म्हणाले, लोकशाहीला दहशतवाद हा मोठा धोका आहे. पण शस्त्र हे त्याला उत्तर नाही.

यावेळी ओबामांनी अगदी घरगुती गप्पाही मारल्या. ते म्हणाले त्यांना चिकन आणि डाळ बनवता येते. आणि डाळ बनवता येणारे ते पहिले अमेरिकन अध्यक्ष आहेत. त्यांना चपाती बनवता येते का विचारलं असता, ते म्हणाले मला रोटी बनवता येत नाही.

मोदींनी त्यांना बराक म्हणून पुकारलं यावर ते म्हणाले, मला ते आवडलं. मोदींकडे देशासाठी एक विचार आहे. मोदींप्रमाणे डाॅ. मनमोहन सिंग माझे चांगले मित्र आहेत.

सोशल मीडियाबद्दल बोलताना ते म्हणाले, सोशल मीडिया प्रभावी आहे. पण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. तो नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. ट्विटरवरचे आपसे फाॅलोअर्स कमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 12:49 PM IST

ताज्या बातम्या